ETV Bharat / state

अमरावती : ब्लॅकमेलकरून अल्पवयीन युवतीवर अत्याचार - amravati latest news

युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढत ते छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन युवतीवर अत्याचार अत्याचार करण्यात केल्याची घटना अमरावतीत घडली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केली आहे.

अमरावती : ब्लॅकमेलकरून अल्पवयीन युवतीवर अत्याचार
अमरावती : ब्लॅकमेलकरून अल्पवयीन युवतीवर अत्याचार; आरोपला अटक
author img

By

Published : Feb 11, 2021, 3:12 PM IST

Updated : Feb 11, 2021, 5:40 PM IST

अमरावती - एका अल्पवयीन युवतीला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाजून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. तसेच तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एका व्यक्तीला अटक केली आहे. सुरज रामटेक (40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

वारंवार लैगिंक शोषण -

आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीच्या आईला कॉल करून मुलीला अमरावतीच्या रामकृष्ण कॉलनीत घरी स्वच्छता करण्यासाठी बोलवले होते. मुलगी या ठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपीने तिला कोल्ड्रींक देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर पीडित अल्पवयीन युवतीला नग्न करत तिचे छायाचित्र काढण्यात आले. त्यानंतर हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना जून 2020 मध्ये घडली होती. मात्र, अखेर या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीच्या घरी सुरू होते आरोपींचे जाणे येणे -

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईसोबत आरोपी सुरज रामटेके याची मे 2020 पासून ओळख होती. त्यामुळे त्याचे मुलीच्या घरी येणे जाणे सुरू होते. त्यानंतर सुरजची ओळख तिच्या मावस बहिणी सोबत झाली. त्यामुळे ते दोघे अधूनमधून भेटत होते. मात्र, पीडित मुलीला त्यांच्यातील भेटीगाठी आवडत नसल्याने ती सूरजचा तिरस्कार करत होती. गत काही दिवसांपूर्वी मावस बहिणीने पीडित मुलीला नवसारी येथे कामानिमित्त बोलावले होते आणि तिथेच कोल्ड्रींकमधून गुंगीचे औषध पाजून तिचे नग्न फोटो काढत वायरल करण्याची धमकी सुरजने दिली होती.

हेही वाचा - अपघाती मृत्यू झालेल्या गर्भवती मांजरावर शस्त्रक्रिया करुन वाचवले पिल्लांचे प्राण; केरळमधील घटना

Last Updated : Feb 11, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.