अमरावती- दूषित पाणी व व्हायरल तापामुळे तिवसा तालुक्यात अतिसाराची लागण सुरू झाली. त्यामुळे तिवसा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची जनू यात्राच भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होते असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होते आहे.
रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण आल्यामुळे एका बेडवर दोन रुग्ण झोपले असून बेडच्या खाली देखील रुग्ण झोपले असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून एका डॉक्टरवर रुग्णालय सुरू आहे. परिणामी, रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून नवीन रुग्णालयाची इमारत तयार झाली आहे. मात्र भाजप सरकारच्या मंत्र्यांकडून नवीन रुग्णालयाचे लोकार्पण केले जात नसल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा- एमआयएमसोबत आघाडी तुटल्याने काही फरक पडणार नाही - प्रकाश आंबेडकर
सद्या तिवसा ग्रामीण रुग्णालयात 40 च्यावर रुग्ण भरती आहेत. तर बाह्य रुग्णालयात ४०० च्यावर रुग्णांनी उपचार घेतले आहे. रुग्णालयात भरती करण्यासाठी रुग्णांकरिता जागा उपलब्ध नसल्याने प्रकृती अधिक खालावलेल्या रुग्णांना जागे अभावी घरी जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिस्थिताचा विचार करून लवकरात लवकर रुग्लयाच्या नवीन इमारतीचे लोकर्पण करावे अशी रुग्णांची मागणी आहे.