अमरावती - विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या, अमरावतीच्या वरुड आणि मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रे कलम (पनेरी)ची लागवड केली जाते. या दोन तालुक्यांमध्ये पनेरीच्या सर्वाधिक नर्सरी आहेत. पनेरी विक्रीमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो. त्यातच, शासनाकडून अर्थसहाय्य मिळत असल्याने, शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या अनेक शेतांमध्ये संत्रे लागवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी कलमांची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे, संत्रे उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर पनेरी खरेदी करतानाचे चित्र सध्या विदर्भाच्या या कॅलोफोर्नियामध्ये दिसून येत आहे.