ETV Bharat / state

Amravati Violence : इंटरनेट सेवा ठप्प; ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम झाले बंद - अमरावती वर्क फ्रॉम होम झाले बंद

इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे (Amravati Internet Connectivity) शहरातील तणाव कमी करण्यास मदत झाली असताना कोरोना काळापासून ऑनलाईन अभ्यास करणारे अभियांत्रिकीसह विविध शाखेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच पुणे आणि मुंबई येथील आयटी क्षेत्रात काम करणारे सॉफ्टवेअर अभियंते अमरावती वर्क फॉर्म होम करणाऱ्यांची कामे मात्र बंद झाली आहेत.

Online education, work from home closed due to Internet service interrupted in amravati
Amravati Violence : इंटरनेट सेवा ठप्प; ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम झाले बंद
author img

By

Published : Nov 16, 2021, 7:18 PM IST

अमरावती - एका जमावाने मोर्चा काढून शुक्रवारी शहरातील काही भागात दगडफेक केली, याची प्रतिक्रिया म्हणून दुसऱ्या समुदायाच्या जमावाने शनिवारी अमरावती बंदचे आवाहन केल्यानंतर तणाव निर्माण झाला. काही वेळातच दगडफेक आणि जाळपोळ मीच या घटनेमुळे अमरावती शहर प्रशांत झाले. शहरातील परिस्थिती आटोक्यात यावी कुठल्याही अफवा पसरू नये या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी शहरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. (Amravati Violence)

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे (Amravati Internet Connectivity) शहरातील तणाव कमी करण्यास मदत झाली असताना कोरोना काळापासून ऑनलाईन अभ्यास करणारे अभियांत्रिकीसह विविध शाखेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच पुणे आणि मुंबई येथील आयटी क्षेत्रात काम करणारे सॉफ्टवेअर अभियंते अमरावती वर्क फॉर्म होम करणाऱ्यांची कामे मात्र बंद झाली आहेत. आता आपला अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना समोर उभा ठाकला असताना आपल्या जॉबवर संकट तर येणार नाही, अशी भीती सॉफ्टवेअर अभियंत्यांना भेडसावत आहे.

सॉफ्टवेअर अभियंत्यांना जॉब संकटात येण्याची भीती -

कोरोना काळापासून पुणे, मुंबई, बंगळुरू याठिकाणी आयटी क्षेत्रात काम करणारे अमरावतीकर अभियंते अमरावतीत आपल्या घरुनच कंपनीची कामे करीत आहेत. शनिवारपासून मात्र इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे आमचे कामही बंद झाले आहे. कंपनीकडून आम्हाला विचारणा केली जात आहे. चार दिवसांपासून आमचा वर्क फॉर्म होम होत नसल्यामुळे आमचा जॉब अडचणीत येईल की काय? अशी भीती माझ्यासह अनेकांना भेडसावत असल्याचे पूजा लोखंडे या सॉफ्टवेअर अभियंता ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या.

हेही वाचा - Amravati Violence : संजय राऊतांनी अमरावती हिंसाचाराबद्दल बोलू नये - नवनीत राणा

आमचा अभ्यास थांबला -

इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे आमचा ऑनलाईन अभ्यास थांबला असल्याचे प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा वानखडे ईटीव्ही भारताची बोलताना म्हणाली. ऑनलाइन अभ्यासासाठी आमच्या महाविद्यालयाने काही ऍप विकसित केले आहेत. मात्र, इंटरनेटचा उपलब्ध नसल्यामुळे हे ॲप कुचकामी झाले आहेत. आता इंटरनेट नेमके कधी सुरू होणार याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ऋतुजा वानखडे म्हणाली.

तरुणांची इंटरनेटसाठी शहराबाहेर धाव -

इंटरनेट बंद असल्यामुळे शहरातील तरुणाई संचार बंदी असताना सुद्धा केवळ इंटरनेट मिळावे यासाठी शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर लांब धाव घेत आहेत. कठोरा मार्ग, मार्डी रोड यासह लोणी गावापर्यंत तरुणाई इंटरनेट कनेक्टिविटी मिळावी म्हणून त्याभागात धाव घेत आहे. विशेष म्हणजे कठोरा मार्ग आणि मार्डी रोडवर दुपारी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत केवळ इंटरनेटसाठी तरुणांची जत्रा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Amravati Violence : अमरावतीत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.