ETV Bharat / state

अज्ञात टोळक्याकडून अट्टल गुन्हेगाराचा भरदिवसा खून

एका प्रकरणाची न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी असल्याने नानीका हसन आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन न्यायालयात जात होता. जाफर जीन परिसरात नानीकावर अज्ञात ३ ते ४ जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नानीकाचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर रिक्षामधून आले होते.

अज्ञात टोळक्याकडून अट्टल गुन्हेगाराचा भरदिवसा खून
author img

By

Published : Nov 25, 2019, 3:47 PM IST

अमरावती - शहरात आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराची अज्ञातांनी हत्या केली. ही घटना शहरातील कॉटन मार्केट लगतच्या जाफर जीन परिसरात घडली. दरम्यान, या घटनेने अमरावती शहर हादरले आहे. शेख हसन शेख हुसेन उर्फ नानीका हसन (४७) असे मृताचे नाव आहे.

नानीका हसन हा एका प्रकरणाची तारीख असल्याने, आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन न्यायालयात जात होता. जाफर जीन परिसरात नानीकावर अज्ञात ३ ते ४ जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नानीकाचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर रिक्षामधून आले होते.

घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे

शहर कोतवाली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नानीका हसनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. रुग्णालयात नानीकाच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे काही काळ रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, नानीका हसन हा अट्टल गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध गुन्ह्यात २५ च्या वर खटले सुरू असल्याचे समजते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - तिच्या "प्रेमाने" व धैर्याने त्याच्या कायमस्वरूपी "अपंगत्वालाही" नाही मोजले; मोहिनी झाली दिव्यांग अक्षयचा आधार

हेही वाचा - पोहरा-मालखेड जंगल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मिळाली 'दिशा'

हेही वाचा - सत्ता स्थापनेत सर्वोच्च न्यायालयाला पडण्याचा अधिकार नाही- बाळासाहेब आंबेडकर

Intro:अमरावती शहरात आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास अट्टल गुन्हेगाराची कॉटन मार्केटलगतच्या मोतीबाग मार्गावरील जाफर जीन परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी उसळून तणाव निर्माण झाला होता.

Body:शेख हसन शेख हुसेन उर्फ नानीका हसन (47) असे मृतकाचे नाव आहे. नानीका हसन हा एका प्रकरणाची तारीख असल्याने आझाद नगर येथील घरातून मित्रासोबत दुचाकीवर स्वार होऊन न्यायालयात जात असताना जाफर जीन परिसरात दुचाकीच्या माघून एका ऑटो रिक्षात आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी दुचाकीवर मागे बसलेल्या नानीका हसनवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नानीका हसन घटनास्थळीच ठार झाला.
शहर कोतवाली पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले. नानीका हसन याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालतात पोलिसांनी आणताच हसनच्या नातेवाईकांची गर्दी जिल्हा सामान्य रुग्णालतात उसळल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गर्दीला पांगवून वातावरण शांत केले.नानीका हसन हा अट्टल गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध गुन्ह्यात 25 च्या वर खटले सुरू असल्याची माहिती आहे.
या घटनेचा आम्ही तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.