अमरावती - अंबाडा गावात पत्नीशी प्रेमसबंध असल्याच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि दगडाने चेहऱ्यावर प्रहार करून हत्या केली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी ३ आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय बडूकले, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जिल्ह्यातील (मोर्शी तालुका) अंबाडा गावात झोपडपट्टीत राहणाऱ्या संजय बडुकले यांची आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आरोपीने हत्या केली. मृत व्यक्तीबरोबर आरोपीचे काही जुने वाद सुद्धा होते, अशी माहिती समजते आहे. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी लताबाई बारंगे, मूतीपाबाई बारंगे आणि सुदामा बारंगे यांच्याविरुद्ध हेत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.