ETV Bharat / state

Dolar Festival : पोळ्याच्या करीला आनंदाचा 'डोलार'; मेळघाटात आगळावेगळा आनंदोत्सव - Satpura Mountains

मेळघाटची आदिवासी संस्कृती खूप समृद्ध आहे. आदिवासी परंपरेत पारंपरिक नृत्याला खूप महत्त्व आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांनी तीच परंपरा जोपासली आहे. पावसानं हिरवेगार झालेल्या मेळघाटच्या जंगलात श्रावण महिन्यात आदिवासी नृत्याविष्काराला विशेष रंग चढतो.

Dolar Festival
Dolar Festival
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 9:32 PM IST

Updated : Sep 16, 2023, 10:00 PM IST

मेळघाटात आगळावेगळा आनंदोत्सव

अमरावती : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पोळ्याच्या करीला, आदिवासी लोक डोलार नावाचा वेगळा सण साजरा करतात. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमीच्या दिवशी गावात मोठा पाळणा बांधला जातो. डोलार सणाच्या दिवशी पाळण्याला विविध पानाफुलांनी सजवलं जातं. गावातील महिला पारंपरिक गाणी गात डोलारा साजरा करतात.

असा असतो डोलार उत्सव : सातपुडा पर्वत रांगेतील कोरकू जमातीच्या अनेक प्रथा, परंपरा आहेत. श्रावण महिना सुरू होताच गावकरी गावात सागवान लाकडापासून बनवलेला मोठा झुला बांधतात. विशेष म्हणजे हा झोका बांधण्यासाठी दोरी किंवा साखळीचा वापर केला जात नाही, उलट झाडाची साल वापरून हा झोका बांधला जातो. एकाचवेळी आठ ते दहा महिला बसू शकतील एवढा हा झोका बांधला जातो.

विविध वनस्पतींचा पनाफुलांचा झोका : पोळाळ्याच्या बैलांची पूजा केल्यावर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावकरी लगतच्या जंगलांमधून विविध वनस्पतींची पानं, फुलं तोडून आणतात. अशा हिरव्या, लाल, पिवळ्या तसंच विविध रंगाच्या पानाफुलांनी हा भव्य झोका सजवला जातो. या झोक्यावर गावातील महिला नटून थटून एकत्रित बसतात. यावेळी पारंपारिक गीत गाऊन झोका घेतात. हा झोका घेत असताना या लाकडी झोक्याचा आवाज येतो. त्या आवाजासह महिला गात असलेल्या सुंदर अशा पारंपरिक गाण्यांमुळं परिसराचं वातावरण अगदी आनंदमय होतं.

हरितालिकेला झोक्याची पूजा : या सणाला डोलार असं आदिवासी बांधव म्हणतात. पिढ्यानपिढ्या कोरकू जमातीमध्ये हा डोलार उत्सव साजरा केला जातो. आदिवासी सामाजाचे अभ्यासक डॉ. एकनाथ ताटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. ज्याप्रमाणं महिला विविध झाडांची पानं गोळा करून हरितालिकेसारखी झोक्याची पूजा करतात. त्याचप्रमाणं मेळघाटातील कोरकू बांधव या डोलार सणात सहभाग घेतात. निसर्गात नव्यानं भरलेल्या अनेक फुलांना महत्त्व देतात, असंही डॉ. एकनाथ ताटे यांनी म्हटलं आहे.

गावालगत नदीत होते डोलारचे विसर्जन : पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारपासून सायंकाळपर्यंत युवती, महिला फुलापानांनी सजवलेल्या झोक्यावर पारंपारिक गीत गातात. सायंकाळी या झोक्यावरील सर्व पानंफुलं एकत्रित करून ग्रामस्थ त्या पानाफुलांची मिरवणूक काढतात. वाजत गाजत ही मिरवणूक ग्रामदेवतेजवळ पोहोचते. या ठिकाणी गावातील पुजारी ग्रामस्थांच्या वतीनं पूजा करतो. पूजेचा विधी पार पडल्यावर सर्व पानाफुलांचा डोलार गावालगत वाहणाऱ्या नदीत विसर्जित केला जातो.

हेही वाचा -

  1. Cabinet Meeting In Sambhaji Nagar : मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान शहरात निघाले मोर्चे
  2. Aamchya Pappani Ganpati Anla: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' गाण्याचा 'गीतकार' आहे वडापाव विक्रेता, वाचा त्याचा खडतर प्रवास...
  3. Ganeshotsav 2023: 'दगडूशेठ'च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचं मंगळवारी उद्घाटन, राष्ट्रीय सरसंघचालकांच्या हस्ते होणार 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना

Last Updated : Sep 16, 2023, 10:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.