ETV Bharat / state

'पीडीएमएमसी'मधील कोरोना योद्ध्यांच्या वेतनात कपात, सलग दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन - 'पीडीएमएमसी'बाहेर परिचारिकांचे आंदोलन

कोरोनाच्या काळात रुग्णालयात सेवा देऊनही तीन महिन्यांपासूनचे वेतन मिळाले नसल्याने परिचारिकांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील परिचारिकांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडून आपले आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप केला. वेतनासोबतच इतर सुविधाही दिल्या गेल्या नसल्याचा आरोपही परिचारिकांनी केला आहे.

nurse strike outside panjabrao deshmukh hospital
'पीडीएमएमसी'मधील परिचारिकांचे आंदोलन
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:04 PM IST

अमरावती - श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिचारिकांचे कामबंद आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. शिक्षण संस्थेकडे पैसा नसल्यास त्यांनी हे रुग्णालयात बंद करावे, असा रोष संतप्त परिचारिकांनी व्यक्त केला. गंभीर बाब म्हणजे, परिचारिकांच्या आंदोलनामुळे या रुग्णालयात बुधवारपासून नवे रुग्ण दाखल करून घेणे बंद करण्यात आले आहे. शिवाय रुग्णालयात दाखल अनेकांना सुट्टी देण्यात येत असून गंभीर आजाराच्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात रुग्णालयात सेवा देऊनही तीन महिन्यांपासूनचे वेतन मिळाले नसल्याने परिचारिकांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील परिचारिकांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडून आपले आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप केला. या रुग्णालयात कायमस्वरूपी असणाऱ्या परिचारिकांना 35 हजार रुपये वेतन दिले जाते. गंभीर बाब म्हणजे, परिचारिकांच्या बँक खात्यात 35 हजार रुपये जमा होताच दुसऱ्याच क्षणी खात्यातून 20 ते 22 हजार रुपये रक्कम श्री शिवाजी शिक्षण संस्था काढून घेते. एकूण 13 परिचारिकांना बारा ते पंधरा हजार रुपये वेतन दिले जाते. त्यापैकी त्यांच्या वेतनातून दर महिन्याला दोन हजार रुपये कापण्यात येतात. दोन वर्षांपासून या 13 परिचारिकांच्या खात्यातून प्रत्येकी 48 हजार रुपये संस्थेने हडपले आहेत.

आपल्याला संस्थेला दान द्यायचे आहे, त्यामुळे तुमचे दोन हजार रुपये दर महिन्याला कापले जातील, असे सांगण्यात आल्याचे आंदोलनात सहभागी परिचारिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी वेतन नसल्याचे कारण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिले आहे. तर, परिचारिकांच्या कामबंद आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. याठिकाणी असणाऱ्या कोविड वॉर्डमध्ये सेवा देणाऱ्या परिचारिकांना वेतनासोबतच इतर सुविधाही दिल्या गेल्या नसल्याचा आरोप परिचारिकांनी केला आहे.

परिचारिकांच्या कामबंद आंदोलनामुळे या रुग्णालयातील कुर्डूवाडीमध्ये सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील चार ते पाच परिचारिकांना बोलवण्यात आले आहे. परिचारिका नसल्यामुळे नव्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला जात असून त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला दिला जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असणाऱ्या गोंधळाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तुमचे प्रश्न लवकर सोडवा, असा सल्ला श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दिला आहे. मात्र, संस्थेकडे पैसाच नाही, असे कारण सांगून परिचारिकांच्या आंदोलनावर आज दुसऱ्या दिवशीही कुठलाच तोडगा निघाला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.