ETV Bharat / state

आता शेतातील पिकांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी, कृषिमंत्र्यांसमोर प्रात्यक्षिक सादर

मायवाडी येथे सोमवारी कृषिमंत्र्यांसमोर या ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. अवघ्या 5 तासांत 100 एकर शेतातील पिकांवर या ड्रोनद्वारे फवारणी शक्य असून संपूर्ण तपासणी होताच ते राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे.

आता शेतातील पिकांवर होणार ड्रोनदद्वारे फवारणी, कृषिमंत्र्यांसमोर प्रात्यक्षिक सादर
author img

By

Published : Jul 23, 2019, 3:13 PM IST

अमरावती - आता शेतातील सर्व प्रकारच्या पिकांवर ड्रोनद्वारे रासायनिक फवारणी करणे शक्य होणार आहे. राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ड्रोनद्वारे फवारणीचा हा राज्यातील पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे.

गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर रासायनिक औषधींची फवारणी करताना काही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात विषारी द्रव्य गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे 800 जणांना याची बाधा झाली होती. आता शेतातील फवारणी शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू नये आणि त्यांचा वेळ वाचावा, या उद्देशाने नाशिक येथील एका कंपनीने शेतात फवारणीसाठी ड्रोनची निर्मिती केली आहे.

आता शेतातील पिकांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी, कृषिमंत्र्यांसमोर प्रात्यक्षिक सादर

मायवाडी येथे सोमवारी कृषिमंत्र्यांसमोर या ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. अवघ्या 5 तासांत 100 एकर शेतातील पिकांवर या ड्रोनद्वारे फवारणी शक्य असून संपूर्ण तपासणी होताच ते राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्द करून देण्यात येणार आल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांच्या गटाला ज्या प्रमाणे अवजार बँक उपलब्ध करून दिली, त्याच स्वरूपात फावरणीसाठीचे ड्रोनही उपलब्ध करून देण्याचा निर्णय येत्या काळात घेतला जाईल. हे ड्रोन 20 मिटरपर्यंत वर जाऊन फवारणी करू शकते.

यावेळी, मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, डॉ. वसुधा बोंडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, राज्य कृषी महामंडळाचे संचालक पियुष कारंजकर, विभागीय व्यवस्थापक दिलीप ब्राम्हणकर यंचयसह शेतकरी उपस्थित होते.

Intro:शेतातील सर्व प्रकारच्या पिकांवर विविध स्वरूपाच्या रासायनिक फवारणी आता ड्रोनद्वारे केली जाणार आहे. राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ड्रोनद्वारे शेतात फवारणीचा राज्यातला हा पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे.

Body:गत वर्षी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर रासायनिक औषधींची फवारणी करताना काही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात विषारी द्रव्य गेल्याने ते दगावले तर सुमारे 800 जणांना याची बाधा झाली होती. आता शेतातील फवारणी ही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू नये आणि झटपट फवारणी व्हावी या उद्देशाने नाशिक येथील एका कंपनीने शेतात फवारणीसाठी ड्रोनची निर्मिती केली आहे. सोमवारी या ड्रोनद्वारे मायवाडी येथे फवारणीचे प्रात्यक्षिक कृषिमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले. अवघ्या 5 तासात 100 एकर शेतातील पिकांवर या ड्रोनद्वारे फवारणी शक्य असून याची संपूर्ण तपासणी पूर्ण होताच हे ड्रोन राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्द करून देण्यात येणार आल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांच्या गटाला ज्या प्रमाणे अवजार बँक उपलब्ध करून दिली त्या स्वरूपातच फावरणीसाठीचे ड्रोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय येत्या काळात घेतला जाईल . ड्रोन 20 मिटर पर्यंत वर जाऊन कीटकनाशकांची फवारणी करू शकते. ड्रोनद्वारे समांतर फवारणी होऊ शकते असेही कृषिमंत्री यावेळी म्हणाले.
ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर झाले तेव्हा मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, डॉ. वसुधा बोंडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, राज्य कृषी महामंडळाचे संचालक पियुष कारंजकर, विभागीय व्यवस्थापक दिलीप ब्राम्हणकर यंचयसह शेतकरी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.