ETV Bharat / state

संचारबंदी असतानाही भरवला भाजीबाजार, तहसीलदारांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ला‌ॅकडाऊनसह संचारबंदी आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणी भाजीपाला बाजार भरू नये, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, याच गर्दीच्या ठिकाणी किरकोळ भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने पुन्हा परवानगी दिली.

notice-to-anjanagaon-suji-chief-executive-officer-in-amravati
'या' प्रकरणी अंजनगाव सुजीच्या मुख्याधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस...
author img

By

Published : Mar 31, 2020, 4:45 PM IST

अमरावती- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी दुकाने लावण्यास मनाई आहे. तरीही गर्दीच्या ठिकाणी दुकाणे लावण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे सक्षम प्राधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंजनगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांना तहसीलदार विश्वनाथ घुगे, यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हेही वाचा- लढा कोरोनाविरुद्धचा : हिमाचल सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ला‌ॅकडाऊनसह संचारबंदी आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणी भाजीपाला बाजार भरू नये, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, याच गर्दीच्या ठिकाणी किरकोळ भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने पुन्हा परवानगी दिली. त्यामुळे त्याठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत होती. त्यामुळे अंजनगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांना तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी तातडीने दिनांक ३० मार्च रोजी आपल्या विरुद्ध फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत दिनांक 31 मार्चपर्यंत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.