ETV Bharat / state

उमर खालिद अमरावतीत कट रचताना सरकार झोपले होते का? - निवेदिता चौधरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारतात आल्यावर दिल्लीत दंगल उसळली होती. विशेष म्हणजे या दंगलीसंदर्भात उमर खालीद याने 17 फेब्रुवारीला अमरावतीच्या चांदणी चौक परिसरात जाहीर सभा घेऊन वाच्यता केली होती. ट्रम्प भारतात आल्यावर काय होणार आहे याची पूर्व कल्पना उमर खालिदने जाहीर केली होती.

सभेचे छायाचित्र
सभेचे छायाचित्र
author img

By

Published : Mar 4, 2020, 11:16 AM IST

अमरावती - जेएनयूचा विद्यार्थी उमर खालीद अमरावतीत येऊन देशात काय घडणार याबाबत कट-कारस्थान रचतो. त्याबाबत भरसभेत बोलतो, असे सारे होत असताना अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसोबतच महाराष्ट्रातील सरकार झोपले होते का? असा सवाल भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.

बोलताना निवेदिता चौधरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारतात आल्यावर दिल्लीत दंगल उसळली होती. विशेष म्हणजे या दंगलीसंदर्भात उमर खालीद याने 17 फेब्रुवारीला अमरावतीच्या चांदणी चौक परिसरात जाहीर सभा घेऊन वाच्यता केली होती. ट्रम्प भारतात आल्यावर काय होणार आहे याची पूर्व कल्पना उमर खालिदने जाहीर केली होती. उमर खालिद याच्या या जाहीर सभेतील वक्तव्याचा अर्थ काढण्यास गुप्तहेर खाते अपयशी ठरले आहे. त्यामुळे अमरावतीचे पोलीस आयुक्त नेमके काय करतात, असा सवाल यानिमित्ताने पुढे आला असल्याचे निवेदिता चौधरी म्हणाल्या.

उमर खालिद याचे यवतमाळ, चांदुर रेल्वे आणि अमरावतीत कार्यक्रम झाले होते. उमर खालिद अमरावतीत आला असता, त्यादरम्यान निश्चितच कट शिजत होता का? या दौऱ्यादरम्यान उमर खालीद कोणा कोणाला भेटला याबाबतची चौकशी होणे आवश्यक आहे. उमर खालीद याच्या चांदुर रेल्वे येथील कार्यक्रमात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे छायाचित्र सभा मंचावर झळकत होते. या सर्व मंडळींचा उमर खालिदला पाठिंबा आहे की काय?, असा प्रश्न भेडसावतो. हा धक्कादायक प्रकार असल्याचे चौधरी म्हणाल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री नेमके काय करीत आहेत? हे कळायला मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नागपूर ही क्राइम सिटी झाल्याची ओरड होत होती. आज राज्याचे गृहमंत्री आपल्याच परिसरातील असताना उमर खालिद अमरावतीत येऊन कट-कारस्थानावर भाष्य करतो ही गंभीर बाब आहे. अमरावती शहरातील इर्विन चौकात गत दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दिल्लीच्या शाहीन बाग प्रमाणे काही वेगळे वळण तर घेणार नाही, अशी भिती वाटत असल्याचे चौधरी म्हणाल्या.

उमरचे आजोळ तळेगाव..-

देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये उमर खलिद याच्या यवतमाळ, चांदुर रेल्वे आणि अमरावतीच्या सभेच्या बातम्या आल्या. मात्र, अमरावतीच्या पोलिसांना उमर खालिदच्या वक्तव्या संदर्भात माहिती नसणे धक्कादायक आहे. उमर खालीदचे आजोळ अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर आहे इतकाच काय तो त्याच्याशी अमरावतीचा संबंध आहे. चांदुर रेल्वेला उमर खालिद याला ज्यांनी निमंत्रण दिले, त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी, असे निवेदिता चौधरी म्हणाल्या.

अमरावतीचे पोलीस आयुक्त सुस्त झोपलेले आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या गंभीर विषयात लक्ष घालायला हवे. अमरावतीकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने पावले उचलायला हवीत, अशी विनंती निवेदिता चौधरी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हेही वाचा - तरुणीच्या हत्याकांडाप्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला अखेर अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.