ETV Bharat / state

आमदार बच्चू कडूंनी दिव्यांगांसोबत फटाके फोडून केली दिवाळी साजरी - आमदार बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात. आमदार बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे.

आमदार बच्चू कडू दिव्यांगांच्या सेवेत, त्यांच्यासोबत फटाके फोडून केली दिवाळी साजरी
author img

By

Published : Oct 27, 2019, 9:36 PM IST

अमरावती - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात. आमदार बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे. पूर्णामाय येथील पुनर्वसन केंद्रात दिवाळी निमित्ताने अनाथ अपंग बांधवांना अभ्यंगस्नान घालून दिले आहे.

आमदार बच्चू कडू दिव्यांगांच्या सेवेत, त्यांच्यासोबत फटाके फोडून केली दिवाळी साजरी

राजकीय नेते हे आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या आनंददायी सेलिब्रेशनसाठी व्यस्त आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी पूर्णामाय येथील पुनर्वसन केंद्र येथे जाऊन आपल्या अनाथ अपंग बांधवांना साबण उटणे लावून आंघोळ घालून त्यांना नवे चकचकीत कपडे परिधान करून दिले आहेत. त्याच्याबरोबर फटाके फोडून दिवाळीची सुरवात केली आहे. बच्चू कडू यांच्या कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. सध्या प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्ह्यात 2 आमदार आहेत. आधी प्रहारचे एकमेव आमदार असलेले बच्चू यांच्या प्रहार पक्षात मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी निवडणूक पूर्वी प्रवेश केला होता. आता ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने आता प्रहारचे 2 आमदार झाले आहेत.

Intro:विजयी उमेदवारांची दिवाळी कुटूंबासोबत पण आ बच्चू कडुंच्या दिवाळीची सुरवात अनाथ अपंगा सोबत
-----------------------------------------------
अमरावती अँकर
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ बच्चू कडू हे नेहमी विविध आंदोलनांनी चर्चेत राहतात. अनेकदा त्यांच्यावर शासकीय अधिकार्‍यांकडून त्यांच्यावर मारहाणीचे आरोप होतात परंतु आ बच्चू कडू यांच्या मध्ये एक आपुलकीची भावना आजही कायम आहे. ती म्हणजे अनाथ अपंग यांची साथ ते कधी सोडत नाही .विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले विजयी उमेदवार दुसऱ्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या तयारीत होते .परंतु एकमेव आमदार बच्चू कडू हे मात्र पूर्णामाय येथील पुनर्वसन केंद्रात दिवाळी निमित्ताने अनाथ अपंग बांधवांना आंघोळ घालून देण्यात व्यस्त होते.

आ बच्चू कडू यांचे वेगळेपण हे नेहमीच चर्चेत राहते.त्यांच्यातील एका सामान्य माणसाची जाणीव ते नेहमीच करून देतात.सध्या दिवाळी सुरू आहे त्यासाठी राजकीय नेते हे आपल्या कुटुंबा सोबत दिवाळीच्या आनंददायी सेलिब्रेशनसाठी व्यस्त आहे. 25 तारखेला दिवाळीची सुरवात झाली. सलग चौथ्यांदा निवडुन आलेले
आ बच्चू कडू यांनी 25 तारखेला सकाळी कुठलाही जलोश न करता सकाळीच पूर्णामाय येथील पुनर्वसन केंद्र येथे जाऊन आपल्या अनाथ अपंग बांधवांना साबण उटणे लावून आंघोळ घालून त्यांना नवे चकचकीत कपडे परिधान करून दिले.तसेच फटाके फोडून त्यांच्या दिवाळीची सुरवात केली. त्यामुळे बच्चू कडू असे एकमेव आमदार असतील ज्यांनी घरच्या दिवाळीला आणि राजकिय घडामोडींना नंतर प्राधान्य देऊन आधी आपल्या अपंग बांधवांना प्राधान्य दिले.त्यामुळे आ कडू यांच्या या कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.