अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माझी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान कर्नाटकात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत युती करण्याचा विचार आम्ही करत आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अमरावती स्पष्ट केले. महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष राहील की नाही, या दृष्टीने कुठलाही विचार झाला नसल्याचे शरद पवार म्हणाले. कृषी पदवीधर संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला संबोधित केल्यावर शरद पवार यांनी पत्रकारांची खास संवाद साधला.
आम्ही एकमेकांना उमेदवारांची यादी देऊ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी ते आम्हाला देणार आहे आम्ही आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देऊ ज्या जागांवर परस्पर विरोधी उमेदवार नाहीत अशा ठिकाणी युती करता येईल असे शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीत भेदभाव नाही : भाजपला फोडाफोडीचे राजकारण करायचे आहे आम्ही मात्र आमची भूमिका घेऊ महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुठलाही प्रकारचे मतभेद नाहीत गौतम अडाणी प्रकरणात जेसीपी म्हणजे संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असे आपले मत आहे संयुक्त संसदीय सदस्यांच्या समिती दोन्ही सभागृहाचे नेते असतात ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांना या समितीत अधिक जागा मिळतात विरोधकांचे सदस्य कमी तर सत्ताधाऱ्यांचे सदस्य अधिक असतात अशा प्रकारची समिती नेमल्यानंतर सत्य बाहेर येईलच याची शाश्वती देता येत नाही अडाणी प्रकरणाची चौकशी गांभीर्याने व्हायला हवी त्यामुळे जीसीपी अर्थात संसदीय संयुक्त समितीच्या ऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने चौकशी करावी अशीच माझी मागणी असल्याचे शरद पवार म्हणाले.
काय आहे प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. याबाबत विविध पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. खुद्द राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनही अजितदादांचा निर्णय मान्य असल्याने या सर्व चर्चेला आणखी उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अखेर खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या सर्व चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.