अमरावती - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मागील दोन तीन दिवसांपासून ते पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांत फिरून कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आज अमरावती येथे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तिवसा येथे जात असताना नाना पटोले यांनी गुरुकुंज मोझरी येथे थांबून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले.
हेही वाचा - अमरावतीत दुचाकी आणि गाडीची झाली धडक; दोन ठार तर एक जखमी
दर्शनावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता ग्रंथ हा समाजाला दिशा दाखवणारा आहे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले. पटोले कालपासून अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांत भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान ते कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहे. सोबतच मदतीचा हात देखील काँग्रेसकडून दिला जात आहे. आज तिवसा येथे सुद्धा नाना पटोले यांचे कार्यक्रम होते. यादरम्यान तिवसाला जात असताना त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे थांबून तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
हेही वाचा - स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार- नाना पटोले