ETV Bharat / state

अमरावतीत दिपाली चव्हाण प्रकरणाची पुनरावृत्ती, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून महावितरण कर्मचाऱ्याने घेतला गळफास - Amravati msedcl employee suicide attempt news

जिल्ह्यातील भातकूली तालुक्यातील येणारे ग्राम गनोजा देवी येथील महावितरण कर्मचारी सचिन प्रल्हाद सोळंके हे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पूर्णानगर ऑफिसमध्ये कार्यरत आहेत.

Sachin solanke
सचिन सोळ्ंके
author img

By

Published : Apr 26, 2021, 7:45 AM IST

Updated : Apr 26, 2021, 1:43 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील चिखलदरामधील वन विभागातील दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर एकदा परत पुनरावृत्ती होता होता टळली आहे.

जिल्ह्यातील भातकूली तालुक्यातील येणारे ग्राम गनोजा देवी येथील महावितरण कर्मचारी सचिन प्रल्हाद सोळंके हे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पूर्णानगर ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वरिष्ठ अधिकारी श्रीराव यांनी सचिन प्रल्हाद सोळंके (वय 33 वर्ष, रा. गणोजा देवी) यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

या त्रासाला कंटाळून 25 एप्रिल 2021ला दुपारी 2 वाजताच्या सुमारास सोळंके यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने कुटुंबाच्या सतर्कतेने व गावातील नागरिकांनी समय सूचकता दाखविल्याने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे सोळंके यांच्यावर प्राथमिक उपचार करून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर त्यांनी आत्महत्या का करत असल्याची नोट्स लिहून ठेवल्याने नातेवाईकांनी सचिन सोळंके यांच्या आत्महत्येला प्रवृत्त करणारे अधिकारी श्रीराव यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर भातकुली पोलिसात आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी गुन्हा दाखल करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Last Updated : Apr 26, 2021, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.