ETV Bharat / state

वीज प्रश्नी आमदार भुयार आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांना दिला धमकीवजा इशारा

मोर्शी-वरूड तालुक्यामध्ये सतत वीज पुरवठा बंद असतो. त्यामुळे, शेतकऱ्यांना त्रास होत आहे. याबाबीची दखल घेत भुयार यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्याकरिता थेट महावितरण अधीक्षक अभियंता संजय खाणंदे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला व त्यांना धमकी वजा इशारा दिला.

MLA Bhuyar threat MSEDCL officer
वीज प्रश्नी आमदार भुयार आक्रमक
author img

By

Published : Nov 10, 2020, 1:22 AM IST

अमरावती- वरूड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार हे शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी चांगलेच आक्रमक झाले आहे. चार दिवसात वरूड मोर्शी तालुक्यातील शेकडो नादुरुस्त रोहित्रे, सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास तुमच्या कार्यालयासोबत तुम्हालाही जाळून टाकू, असा धमकीवजा इशारा भुयार यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिला आहे.

वीज प्रश्नी आमदार भुयार आक्रमक

वरूड मोर्शी तालुक्यामध्ये सतत वीज पुरवठा बंद असतो. त्यामुळे, शेतकऱ्यांना त्रास होत आहे. याबाबीची दखल घेत भुयार यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी तत्काळ सोडवण्याकरिता थेट महावितरण अधीक्षक अभियंता संजय खाणंदे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

महावितरणचा हलगर्जीपणा

महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वरूड मोर्शी तालुक्यामध्ये १६ केव्हीचे २५ रोहित्र, ६३ केव्हीचे २० रोहित्र, १०० केव्हीचे ४० रोहित्र, असे एकून ८५ नादुरुस्त रोहित्र बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी अधीक्षक अभियंता अमरावती यांना चांगलेच धारेवर धरले.

या आधीसुद्धा महावितरणने दिले होते निर्देश

या आधीसुद्धा भुयार यांनी वरूड येथे आढावा बैठक घेऊन वरूड मोर्शी तालुक्यातील नादुरुस्त ८५ रोहित्र, सर्वच फिडरवरील रात्रीला सिंगल फेज लाईन २५ आक्टोबर पर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महावितरण विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहून भुयार यांनी थेट अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करून अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचा इशारा भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे.

माझ्या शांतपणाचा फायदा घेऊ नये

महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वरूड मोर्शी तालुक्यातील शेकडो रोहित्रे नादुरुस्त असल्यामुळे तालुक्यातील शेतकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महावितरण विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून, नादुरुस्त रोहित्रे बसवन्याचे काम, तालुक्यातील सर्वच फिडरवरील शेतातील सिंगल फेज ४ दिवसात सुरू करण्याचे निर्देश दिले असून या कामामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नाही. मी शांत आहे म्हणून संथ नाही. माझ्या शांतपणाचा फायदा अधिकाऱ्यांनी घेऊ नये, अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आमदार भुयार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

वरूड मोर्शी विदर्भाचा कॅलिफोर्निया

अमरावती जिल्ह्यातील वरूड मोर्शी तालुका हा विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात हजारो हेक्‍टरवर संत्रा पीक आहे. त्यामुळे, आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वीज बंद असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा- अचलपूरमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, एक ठार तर एक गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.