अमरावती - औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारी मनसेच्या वतीने अमरावती बसस्थानकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी औरंगाबादला जाणाऱ्या बसची पाटी काढून फेकली व औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी केली.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी
मनसे कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात आंदोलन केले, मनसेच्या वतीने अमरावतीहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसचे फलक हटवण्यात आले, व त्याजागी छत्रपती संभाजी नगर असे नाव असलेले फलक लावण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष देखील केला. यामुळे परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मनसेचे महानगराध्यक्ष संतोष बद्रे, शहराध्यक्ष गौरव बांते, शहरउपाध्यक्ष सचिन बावनेर, सुरेश चव्हाण, शहर सचिव पवन राठी यांची उपस्थिती होती.