अमरावती - वेगळ्या शैलीत आंदोलन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी मार खाने की याद आ रही क्या, असे म्हणत बँकेच्या व्यवस्थापकाला चांगलेच झापले आहे. एका शेतकऱ्याचे पीक विम्यासाठी मिळालेल्या अनुदानातून पैसे कापल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघातील करजगाव येथील सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाला धारेवर धरत शाखा व्यवस्थापकाला फटकारले आहे. शेतकऱ्याच्या अनुदानाचे पैसे कापल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला. यामुळेच बच्चू कडू यांनी बँक व्यवस्थापकाला मार खानेकी याद आ रही क्या असे म्हणत दम भरला.
अमरावतीच्या चांदुरबाजार तालुक्यातील करजगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेमध्ये गुरूवारी बच्चू कडू गेले होते. एका शेतकऱ्याचे पीक विम्यासाठी त्याच्या अनुदानातून बँक व्यवस्थापकाने पैसे कापले असल्याचा आरोप होता. शेतकरी आत्महत्या वाढत असताना व सरकार शेतकरी कर्ज माफ करत असताना अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून कापने चुकीचे आहे, असे कडू यांनी सांगितले, मार खायचाय का? असेही ते म्हणाले. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत.