ETV Bharat / state

संपूर्ण लसीकरणासाठी अमरावती जिल्ह्यात मिशन 'इंद्रधनुष्य-2' मोहिमेचा शुभारंभ - अमरावती मिशन इंद्रधनुष्य-२

संपूर्ण लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य-२ ही विशेष मोहीम अमरावती जिल्हा आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत सर्व गर्भवती स्त्रिया आणि दोन वर्षांखालील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य-२
लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य-२
author img

By

Published : Dec 4, 2019, 11:28 AM IST

अमरावती - जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य-२ ही विशेष मोहीम जिल्हा आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत सर्व गर्भवती स्त्रिया आणि दोन वर्षांखालील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मिशन इंद्रधनुष्य-२ जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती केली जात आहे.

अमरावती आरोग्य विभागाकडून क्षयरोग, कावीळ, पोलिओ, गोवर, रूबेला घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात या आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते. काही कारणांमुळे लसीकरण होऊ न शकलेल्या आणि अर्धवट लसीकरण झालेल्या गरोदर स्त्रिया व बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्याचे उद्दीष्ट या योजनेचे आहे.

आत्तापर्यंत या मोहिमे अंतर्गत ग्रामीण भागातील २०४ गरोदर स्त्रियांचे आणि शून्य ते दोन वयोगटातील १ हजार ३६२ बालकांचे लसीकरण करण्यात आले. शहरी भागातील ६८ गरोदर स्त्रिया आणि शून्य ते दोन वयोगटातील ४४५ बालकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Intro:संपूर्ण लसीकरणासाठी अमरावती जिल्ह्यात मिशन "इंद्रधनुष्य-2" मोहिमेचा शुभारंभ..

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य-२ ही विशेष मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली असून त्यात सर्व गर्भवती माता व दोन वर्षाखालील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे .या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून मिशन इंद्रधनुष्य-२ मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

आरोग्य विभागा कडून क्षयरोग, कावीळ, पोलिओ, गोवर ,रूबेला घटसर्प ,डांग्या, खोकला ,धनुर्वात आदी आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते .तथापि काही कारणांमुळे लसीकरण न होऊ शकलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या गरोदर माता व बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य -२ ही मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

त्यानुसार या मोहिमे अंतर्गत ग्रामीण भागातील २०४ गरोदर मातांचे आणि शून्य ते दोन वयोगटातील १ हजार ३६२ बालकांचे लसीकरण करण्यात आले तसेच नागरी भागातील ६८ गरोदर मातांचे आणि शून्य ते दोन वयोगटातील ४४५ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.