अमरावती - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मुंबई येथील अंबानीच्या कार्यालयावर काल स्वभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आधीच राज्यमंत्री बच्चू कडू यांना काही तास नागपुरातच अडवून ठेवल्याने राज्यमंत्री बच्चू कडू हे या मोर्चात सहभागी होऊ शकले नाही. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका फेसबुकवर पोस्टद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट मध्ये...?
माझ्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा मी आंदोलनाला पोहचू शकलो नाही. पोलीस प्रशासनाच्या गैरसमजामुळे माझे सकाळी ९चे फ्लाईट सुटले. त्यानंतर मी १२च्या फ्लाईटने आंदोलनाठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतु पोहचू शकलो नाही. याकरिता दिलगिरी व्यक्त करतो. या आंदोलनात महाराष्ट्रातून आलेले हजारो प्रहारचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनास मा. राजू शेट्टी, मा. जयंत पाटील, बाबा आढावजी, प्रतिभा ताई शिंदे, प्रहारचे बल्लु जवंजाळ व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार. आपण हे आंदोलन यशस्वी केले.