ETV Bharat / state

MH MP Governor Meet : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद! दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या बैठकीत कोश्यारींचे मोठे विधान - Governor Meeting in Amaravati

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा चांगला परस्पर समन्वय आहे. तो दृढ व व्यापक करण्यासाठी संघटित प्रयत्न व्हायला हवेत, असे निर्देश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल ( Madhya Pradesh Governor Mangubhai Patel ) यांच्यासोबत सीमावर्ती भागातील प्रश्न सोडविण्यासाठी बैठक ( Regarding border difficulties Meeting ) आयोजित करण्यात आली होती.

Meeting of Governors
दोन्ही राज्यपालांच्या बैठक
author img

By

Published : Dec 23, 2022, 7:43 PM IST

Updated : Dec 24, 2022, 10:01 PM IST

अमरावती : सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद ( Border Dispute ) सुरु आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी सीमावर्ती भागातील गावांनी परराज्यात समाविष्ट होण्याची मागणी केली होती. याची पुनरावृत्ती इतर सीमावर्ती भागात होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील समस्या सोडविण्यासाठी आज ( 24 डिसेंबर ) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari ) व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल ( Madhya Pradesh Governor Mangubhai Patel ) यांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक ( Governor Meeting in Amaravati ) आयोजित करण्यात आली होती.

या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची उपस्थिती : महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे झाली. यावेळी दोन्ही राज्यांचे राज्यपाल व सीमावर्ती जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलडाणा व मध्यप्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा, सिवनी, बैतूल, बुऱ्हानपूर, खांडवा आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

परस्पर समन्वयाची गरज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, दोन्ही राज्यांतील सीमावर्ती भागातील प्रश्न सौहार्दपूर्वक व सामंजस्याने सोडवावेत. त्यासाठी सातत्यपूर्ण परस्पर समन्वय ठेवावा. पूरस्थिती व सिंचन प्रकल्पासंबधीचे प्रश्न स्थानिक स्तरावर उपाययोजना आखून समन्वयाने सोडवावेत. स्थलांतरित मजूरांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या नोंदी विशेष ॲप तयार करून नियमित घ्याव्यात जेणेकरुन त्यांची माहिती दोन्ही राज्यातील प्रशासनाला मिळून त्यांना विविध योजनांचा लाभ देता येणे शक्य होईल. दोन्ही राज्यांनी सीमावर्ती जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

अवैध प्रकरांना बसावा आळा : अवैध गोवंश वाहतूक, अवैध मानवी वाहतूक, बेकायदेशीर खनिज उत्खनन, अवैध शस्त्रे, गुटखा, दारुविक्री, मादक पदार्थ यांना पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा व्यवस्था पुरेसे मनुष्यबळ ठेवून सुसज्ज करावी. तसेच तिथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवून चोख निगराणी ठेवावी. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलीस विभागाने संयुक्त अभियान राबवावे, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.

राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या सूचना : मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी सीमावर्ती जिल्ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन्हीकडच्या प्रशासनात परस्पर चर्चा आवश्यक आहे, असे यावेळी त्यांनी म्हटले. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या समस्या राज्य स्तरावरुन सोडविल्या जाणे आवश्यक आहे. त्याबाबत राज्य शासनाला सूचित करण्यात येईल. ही समन्वय बैठक पुढील काळात निश्चित लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपत्ती काळात व्हावी मदत : आपत्तीच्या काळात तसेच पूरस्थिती आदींबाबत पूर्वसूचना संबंधित जिल्ह्यांना परस्परांकडून वेळेत मिळणे आवश्यक आहे. तशी समन्वय यंत्रणा प्रत्येक जिल्ह्याने कार्यान्वित करावी. सारस पक्षी संवर्धन उपक्रमासारखे काही महत्वपूर्ण प्रकल्प दोन्हीकडे राबविता येणार असल्याने तशी माहिती संबंधित जिल्ह्यांना कळवावी, अशीही सूचना त्यांनी केली.

या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती : मध्यप्रदेश येथील राज्यपालांचे प्रधान सचिव डी.बी. आहुजा, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, नागपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे अमरावती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या बैलगाडीची प्रतिकृती दोन्ही राज्यपालांना भेट देण्यात आली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याविरोधात काही शिवसैनिकांनी सकाळी आंदोलन केल्यामुळे बैठकीच्या ठिकाणी जाण्याची संबंधित अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. बैठक संपल्यानंतर मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुबाई पटेल थेट एक्सप्रेस हायवे वरून बेलोरा विमानतळाकडे गेले तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे नागपूरकडे रवाना झालेत. यावेळी तपोवन चौक परिसर बियाणी चौक पंचवटी चौक या भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहेत हे जिल्हे : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांची सीमा मध्यप्रदेशातील बालाघाट ,शिवनी, छिंदवाडा, बैतूल, बुऱ्हानपूर, खंडवा, हारगोन, बडवाणी, आणि अलीराजपुर या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. यापैकी महाराष्ट्रातील नागपूर अमरावती बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यातून थेट मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात नियमित वाहतूक होते. अमरावती जिल्ह्यातून बैतूल, खंडोबा, बऱ्हाणपूर , छिंदवाडा या जिल्ह्यात सतत दळणवळण होते.

Last Updated : Dec 24, 2022, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.