अमरावती - रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी मेळघाटात कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी महिलांसाठी मशरूम लागवडीचे शिबीर भरवण्यात आले होते.
धारणी तालुक्यातील कारा या गावातील महिलाांना मशरूम उत्पादकता व विकास प्रशिक्षणासंदर्भात प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांना उत्पादनासाठी लागणारे स्पॉन, जंतुनाशक तसेच लागवडीसाठी आवश्यक असणाऱया प्लास्टिकच्या पिशव्यांचे वाटप आयोजकांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शकाची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ.प्रणिता कडू यांनी स्वीकारली. त्यांनी उपस्थित महिलांच्या सहभागाने मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले.
अतिवृष्टी तसेच अन्य नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी शेतीसोबतच जोडधंद्यातून रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी संबंधित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.