अमरावती Leopard skin smuggling: परतवाडा येथील अरुणोदय लॉज येथे काही माणसं वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांना मिळाली होती. (Animal Organs Trafficking) त्यांनी याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार महसूल गुप्तचर विभाग आणि वन विभागाच्या परतवाडा वनपरिक्षेत्राच्या पथकानं संयुक्तपणे सापळा रचून चार आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक केली. तसेच त्यांच्याकडून चारचाकी वाहन देखील जप्त केलं. या कारवाईदरम्यान भुला कुना बेहेरा (27, रा. पारसपाट ओडिशा), जगा धाना पटेल (27, रा. गुणचित्तर ओडिशा), चंद्रमणी नारायण बेहरा (27, रा. आनंदपूर, ओडिशा) आणि अशोक दादूजी मुंडे (55, रा. कांडली, परतवाडा) या चार जणांना अटक केली आहे.
आरोपींची करणार कसून चौकशी: या प्रकरणात वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या टोळीनं आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या अवयवांची कुठे तस्करी केली, कुठल्या भागात शिकार केली याबाबत संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक जयवती बॅनर्जी यांनी दिली आहे. जयवती बॅनर्जी यांच्यासह अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनरक्षक प्रशांत भुजाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके, वनपाल पीएम उमक, वनरक्षक पी. आर आलोकार यांनी ही कारवाई केली.
तस्करांना रंगेहाथ अटक: बिबट्याच्या कातडीच्या तस्करीची अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली होती. यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी आलेल्या टोळीला चिपळूण पोलिसांनी 14 जुलै, 2019 रोजी रंगेहाथ पकडले होते. या कारवाईत दोघांकडून 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते.
साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त: कमलेश देसाई, शशिकांत देसाई, सुनील सावरटकर आणि संजय गुजर, या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कारवाईत 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे व 50 हजार रुपयांची गाडी, असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
हेही वाचा: