ETV Bharat / state

औषध, इंजेक्शन वापराबाबत रेकॉर्ड ठेवा; अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचे रुग्णालयांना निर्देश

रेमडेसिवीर व इतर शेड्युल्ड ड्रग्ज वापराबाबत रुग्णालयांनीही त्यांच्या स्तरावर संनियंत्रण केले पाहिजे, तसेच त्याच्या वापराबाबत संपूर्ण अभिलेख अद्ययावत ठेवावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.

Workshop on Mucormycosis Amravati
डॉक्टर कार्यशाळा जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थिती
author img

By

Published : May 22, 2021, 9:04 PM IST

अमरावती - रेमडेसिवीर व इतर शेड्युल्ड ड्रग्ज वापराबाबत रुग्णालयांनीही त्यांच्या स्तरावर संनियंत्रण केले पाहिजे, तसेच त्याच्या वापराबाबत संपूर्ण अभिलेख अद्ययावत ठेवावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.

माहिती देताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल

हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती करणारे देशातील पाहिले राज्य'

महापालिकेने आयोजित केली कार्यशाळा

जिल्हा प्रशासन व अमरावती महापालिकेमार्फत कोरोना उपचार प्रोटोकॉल व म्युकरमायकोसिस आजारासंबंधी डॉक्टरांची कार्यशाळा बचत भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

दर आठवड्याला अहवाल सादर करा

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, रेमडेसिवीर व इतर शेड्युल्ड ड्रग्ज वापराबाबत रुग्णालयांचे संनियंत्रण असावे. वापराबाबत संपूर्ण अभिलेख अद्ययावत असला पाहिजे. कुठल्या रुग्णाला इंजेक्शन दिले, त्याचे नाव, पत्ता, इंजेक्शनचा बॅच क्रमांक यांच्या नोंदी ठेवाव्यात. रिकाम्या व्हायल्सवर त्या कुठल्या रुग्णासाठी वापरल्या त्याचे नाव नोंदवून सुरक्षित ठेवाव्यात. दर आठवड्याला याबाबतचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला सादर करावा.

रुग्णालयांनी आवश्यक औषधे, इंजेक्शनबाबत प्रशासनाशी संपर्क साधा

आवश्यक औषध, इंजेक्शन हवे असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यासाठी प्रशासन व रुग्णालयांचा व्हाट्सॲप ग्रुपही सुरू केला आहे. त्यामुळे, मागणी नोंदवताच वेळेत पुरवठा केला जाईल. मात्र, परस्पर रुग्णांना चिठ्ठी देऊन इतरत्र शोधायला पाठवू नये. काळ्या बाजाराला उत्तेजन मिळेल अशी कुठलीही कृती करू नये. गरज असेल तेव्हा माहिती द्या, तात्काळ औषध मिळवून दिले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन रुग्णालयांनी रेकॉर्ड न ठेवणे, तसेच विहित दरापेक्षा अधिक दर आकारल्याचे आढळल्याने नोटीस बजावण्यात आली. असे पुन्हा घडता कामा नये. रुग्णांची आर्थिक पिळवणूक होता कामा नये. प्रत्येक बाबीचा वस्तुनिष्ठ रेकॉर्ड रुग्णालयात उपलब्ध असावा. आवश्यकता असल्यास डेटा अपडेशनसाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करावी. मात्र, सर्व तपशील अचूक असणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णालयांकडून रेकॉर्ड व्यवस्थापन व पारदर्शकता आवश्यक

रुग्णालयांनी उपचारप्रक्रियेत रेकॉर्ड व पारदर्शकता ठेवणे आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट, बिल्डिंग परमिशन आदी प्रक्रिया काटेकोरपणे पाळण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

डिस्चार्ज रुग्णांची माहिती नियमित द्या

रुग्णालयातून बरे होऊन डिस्चार्ज झालेल्या सर्व रुग्णांची माहिती नियमितपणे महापालिकेला सादर करावी. आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रत्येक बाबीचे पालन होणे आवश्यक आहे, असेही निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा - रेमडेसिवीरच्या काळा बाजाराविरोधात अमरावतीत रुग्णालयात मुंडन आंदोलन

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.