ETV Bharat / state

विदर्भातील कौंडण्यापूर - रुक्मिणीचे माहेरघर - pandharpur news

रुख्मिणीच्या पालखीने यावर्षी ४२८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुराणात अमरावती जिल्ह्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडण्यापूरवरून रुख्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करतांना अमरावतीच्या एकविरा देवीच्या तळाखालून ते कौंडण्यापूरपर्यंत भुयार खणले होते. या ठिकाणी एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा सुमारे ४२८ वर्षाची आहे.

रुक्मिणीचे माहेरघर
रुक्मिणीचे माहेरघर
author img

By

Published : Jul 10, 2021, 9:23 AM IST

Updated : Jul 11, 2021, 12:34 PM IST

अमरावती - आषाढी वारी निमित्त पंढरपुरात महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत. आणि त्यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यापूर येथील आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. श्री संत सद्गुरु सदाराम महाराज यांनी ई सन १५९४ साली सुरू केलेल्या या पालखीला ४२८ वर्षाची परंपरा लाभली आहे. विदर्भ राजकन्या जगज्जननी तिवसा तालुक्यातील कौंडण्यापूर येथील श्री रूक्मिणी मातेची प्रथम पायदळ असलेली मानाची पालखी आहे.ही पालखी येत्या १८ जुलै रोजी एसटी बसने पंढरपूरसाठी मोजक्या भाविकांसह निघणार आहे.

रुक्मिणीचे माहेरघर

राज्यातील सर्वात जुनी पालखी
रुख्मिणीच्या पालखीने यावर्षी ४२८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुराणात अमरावती जिल्ह्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडण्यापूरवरून रुख्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करतांना अमरावतीच्या एकविरा देवीच्या तळाखालून ते कौंडण्यापूरपर्यंत भुयार खणले होते. या ठिकाणी एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा सुमारे ४२८ वर्षाची आहे.

मोजक्याच भाविकांना घेऊन जाणार पंढरपूरला
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे कौंडण्यापूरची पालखी ही मोजक्याच भाविकांना घेऊन जाणार आहे. अमरावतीत वर्धा नदीच्या तीरावर हे रुक्मिणीच मंदिर आहे. तर देवी रुक्मिणीच माहेर कौंडण्यापूर समजलं जाते. येथे विठ्ठल व रुक्मिणीच्या आकर्षक अश्या मूर्त्या आहेत.

हेही वाचा - राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

Last Updated : Jul 11, 2021, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.