ETV Bharat / state

Kal Lavi Conservation Project : 'कळलावी' भांडण लावणारी नाही, तर 'व्याधिमुक्त' करणारी वनस्पती; जाणून घ्या 'कळलावी'चे फायदे - कळलावीचा अभ्यास

Kal Lavi Conservation Project : 'कळलावी' ही वनौषधी महिलांची प्रसूतीसंबंधी समस्या, त्वचाविकार, संधिवात, पोटाचे विकार आदी विविध व्याधींवर हमखास उपाय म्हणून ओळखली जाते. ही औषधी वनस्पती जगवण्यासाठी अमरावतीत विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे.

Kal Lavi Conservation Project
कळलावी वनस्पती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 10:08 AM IST

Updated : Sep 26, 2023, 11:57 AM IST

'कळलावी' भांडण लावणारी नाही, तर आरोग्य देणारी औषधी

अमरावती Kal Lavi Conservation Project : लाल, पिवळ्या रंगाचं आणि एखाद्या बाहुलीच्या हातागत आकाराचं 'कळलावी' हे फूल घरात नेलं तर महिलांमध्ये भांडणं लागतात, असा अपप्रचार करण्यात येतो. मात्र महिलांना प्रसूतीदरम्यान कळा येण्यासाठी अतिशय उपयुक्त ही कळलावी औषधी ( Ayurvedic Medicine ) माणसांच्या अनेक आजारांवर अतिशय महत्त्वाचं औषध आहे. ही वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर असताना यावर्षी अमरावती शहरालगतच्या जंगलासह मेळघाटात मोठ्या प्रमाणात बहरली आहे. संकटग्रस्त यादीत समाविष्ट असणाऱ्या या 'कळलावी' वनस्पतीच्या संवर्धनासाठी वनस्पती शास्त्र अभ्यासक सरसावले आहेत. जिल्हाभरात जिथं सध्या कळलावी आढळून येत आहे, त्या सर्व भागात त्याच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवला जात आहे.

असा आहे कळलावी संवर्धन प्रकल्प : ग्लोरिओसा सुपरबा असं कळलावीचं सायंटिफिक नाव असल्याचं वनस्पती शास्त्रज्ञ आणि अमरावतीच्या नरसम्मा महाविद्यालयातील पर्यावरण विभाग प्रमुख डॉक्टर सचिन तिप्पट यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. गत पंधरा वर्षांपासून अमरावती शहरालगतच्या जंगलात 'कळलावी' आढळून आली नव्हती. यावर्षी मात्र छत्री तलाव भानखेडा परिसरातील जंगलात 'कळलावी' जिकडंतिकडं बहरली आहे. मेळघाटाच्या हिरव्यागार जंगलात लाल पिवळ्या रंगाची 'कळलावी' उठून दिसत आहे. हे वृक्ष रेड लिस्टेड अर्थात संकटग्रस्त वनस्पतींच्या यादीत आहे. यावर्षी जिल्ह्यात जिथं मोठ्या प्रमाणात 'कळलावी' दिसत आहे, त्यावर 'कळलावी'चा अभ्यास करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसह आम्ही खास प्रकल्प राबवत असल्याची माहिती सचिन तिप्पट यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत 'कळलावी' झाडाची घनता किती आहे, याची आम्ही मोजणी करत आहोत. या वृक्षाला कुठल्या भागात वाढण्यास पोषक वातावरण आहे, याची माहिती देखील घेत आहोत. या वृक्षाची अमरावती शहरालगतच्या जंगलात किती मुबलकता आहे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी 'कळलावी' किती मुबलक प्रमाणात आहे, याचा अभ्यास देखील आम्ही या प्रकल्पांतर्गत करत आहोत, असं प्रा डॉ सचिन तिप्पट म्हणाले. आता गणेशोत्सव काळात सुंदर अशी लाल लालपिवळी फुलं तोडून नेतात, मात्र असं होऊ नये, यासंदर्भातदेखील जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं प्रा. डॉ सचिन तिप्पट म्हणाले.

अशी आहेत 'कळलावी'चं वैशिष्ट्य : डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, मुरमाड जमिनीवर आढळणारी 'कळलावी' ही झुळूकवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीच्या फुलांचा आकार गौरीच्या हाताप्रमाणं दिसत असल्यानं हिला अनेक ठिकाणी 'गौरीचे हात'देखील म्हणतात. फुलांच्या पाकळ्यांची टोकं तांबडी आणि मधला भाग पिवळा असल्यानं काही भागात अग्निज्वाला, तर दुरून समईची ज्योत ठेवल्यासारखी दिसत असल्यानं कुठं हिला 'अग्निशिखा' म्हणून ओळखलं जाते. 'अग्निशिखा' या वनस्पतीला अग्निमुखी, कलहारी, गौरीचे हात, नखस्वामी, बचनाग, अशा अनेक नावांनी ओळखल्या जात असल्याची माहिती संकटग्रस्त वनस्पतीचा अभ्यास करणारे श्रीनाथ वानखडे यांनी "ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

असे आहेत औषधी गुण : कळलावी ही वनस्पती मुळात विषारी असून सूज येणं, संधिवात, विंचू किंवा सर्पदंश, त्वचेवरील व्रण, जखमा, मुरूम, मुळव्याध, कुष्ठरोग, पोटाचे विकार, वंध्यत्व, वेदनाशामक, सुलभ प्रसूतीसाठी लाभदायक आहे. 'कळलावी'च्या कंदाचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी होत असल्यानं कंदाची खूप मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. तसेच ही वनस्पती विषारी असल्यानं चुकीच्या पद्धतीनं सेवन केल्यास उलट्या जुलाब लघवीद्वारे रक्तस्त्राव असे दुष्परिणाम आढळतात. यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनातच कळलावीचा वापर करावा, असं श्रीनाथ वानखडे यांनी यावेळी सांगितलं.

'कळलावी' भांडण लावणारी : महिलांना प्रसूती दरम्यान येणाऱ्या कळाय सुलभ व्हाव्यात, यासाठी या वनस्पतीच्या लेपाचा वापर अनेक जाणकार पूर्वी करत होते. आजदेखील काही ग्रामीण भागात प्रसूती कळांसाठी कळलावीचा वापर केला जातो. या वनस्पतीचं फुल घरी आणल्यास, वनस्पती घरी किंवा बागेमध्ये लावल्यास, घरी भांडण तंटे होतात, असा अपप्रचार झाल्यामुळे भांडण लावणारी 'कळलावी' म्हणून देखील ही वनस्पती ओळखली जाते.

हेही वाचा :

  1. Ayurvedic Medicine : मेळघाटच्या पायथ्याशी पानपिंपरीचे उत्पादन, आयुर्वेदिक औषधी म्हणून देशभर मागणी
  2. Ayurvedic Cigarettes : व्यसनाधीनतेकडून आरोग्यसंपन्नतेकडे नेणाऱ्या पुण्याच्या आयुर्वेदिक सिगरेटला पेटंट

Last Updated : Sep 26, 2023, 11:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.