अमरावती - विदर्भाचे नंदनवन अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात विविध प्रजातीचे प्राणी, वन्य जीव, पक्षी हे पर्यटकांच्या नेहमीच आवडीचा विषय ठरत आहे. आता त्यात पिवळ्या रंगाचे 'इंडियन बुलफ्रॉग' या प्रजातीच्या बेडकांचे टोळके हे पहिल्या पावसामुळे तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारताना दिसून आले आहेत. यामुळे निसर्ग प्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
मेळघाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटाकांची मोठी रिघ येथे लागलेली असते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमध्ये काही अंशी दिलासा जरी मिळाला असला तरी पर्यटनाला अजूनही बंदी आहे. त्यामुळे यंदा मेळघाटात पर्यटकांविना ओस पडलेलेल आहे.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण