ETV Bharat / state

रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मृतांच्या अस्थी, राख स्मशानातच पडून - अमरावती कोरोना मृतदेह

अमरावतीत कोरोना मृतांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, नंतर नातेवाईक अस्थी, राख घेऊन जात नाहीत असे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ही राख पोत्यात भरून ठेवली जात आहे. कोणी नाही आले तर पालिका प्रशासन त्याची विल्हेवाट लावत आहे.

amravati
अमरावती
author img

By

Published : May 24, 2021, 7:21 PM IST

अमरावती - कोरोना मृतदेहांवर येथील विलास नगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. आज (24 मे) एकूण 57 जणांच्या मृतदेहांची राख, अस्थी नेण्यासाठी कुणीही स्मशानात आलेले नाही. कोरोनाने प्राण गमावणाऱ्यांच्या अस्थी आणि राखेकडे रक्ताच्या नात्यांनीही पाठ फिरविल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत राखेने भरलेली पोती तशीच पडून आहेत.

रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मृतांच्या अस्थी, राख स्मशानातच पडून

दीड महिन्यांपासून विलास नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

कोरोनाने दगवणाऱ्यांच्या मृतदेहांवर शहरातील सर्वात मोठ्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमीवरचा ताण कमी व्हावा म्हणून विलास नगर येथील स्मशानभूमीत दीड महिन्यांपासून कोरोना मृतांवर अंत्यविधी केला जात आहे.

राखेच्या पोत्यांवर लिहिले मृताचे नाव

ज्या कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणायत आले. त्यांची राख सावडायला त्यांचे कोणीही नातेवाईक आले नसल्याचे दिसले. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या आदेशानुसार स्मशानभूमीत सेवा देणारे भालेराव यांनी प्रत्येकाची राख सावडून पोत्यात भरली आहे. अमरावती शहर तसेच जिल्ह्यातील धारणी, वरुड, चांदूर रेल्वे, अचलपूर तालुक्यासह वर्धा, नागपूर जिल्ह्यातील मृत व्यक्ती आणि मध्यप्रदेशातील काही शहरांतून अमरावतीत उपचारासाठी आल्याने मृत्यू झालेल्यांचीही राख या स्मशानात जपून ठेवली आहे. तर एका दाम्पत्याची राख एकाच पोत्यात भरून ठेवल्याची माहिती भालेराव यांनी दिली. शिवाय, त्या पोत्यावर ज्याची राख आहे त्याचे नावही लिहिण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या स्मशानभूमीत नाल्यातच राखेचे विसर्जन

शहरातील सर्वात मोठ्या हिंदू स्मशानभूमीत दररोज अनेक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. याठिकाणी मृतांची राख स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या नाल्यातच विसर्जित केली जात आहे.

नातेवाईकांची वाट पाहिली जाते

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंतिम स्मृती नेण्यासाठी त्यांचे कोणी नातेवाईक येतील याची वाट पाहिली जात आहे. ठराविक मर्यादेपर्यंत कोणी आलेच नाही तर स्मशानभूमीत जपून ठेवलेल्या या राखेची विल्हेवाट अखेर महापालिका प्रशासनालाच लावावी लागत आहे, असेही भालेराव म्हणाले.

हेही वाचा - पोलिसांनी दलित युवकाचे हातपाय बांधले, मारहाण केली आणि पाजले मूत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.