अमरावती - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. अनेक भागात जोरदार गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर रबी हंगामातील गव्हाचा पेरा आहे. मात्र अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेला गहू पूर्णत: खराब झाला आहे. वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने गहू पूर्णत: जमीनदास्त झाला आहे. दरम्यान गहू पिकांबरोबरच रबी हंगामातील हरभरा, कांदा, भाजीपाला तसेच संत्र्याच्या फळबागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.
हेही वाचा-शरद पवारांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार