ETV Bharat / state

अमरावतीत सायरन वाजवत स्मशानाकडे निघाल्या १५ ते २० रुग्णवाहिका; नागरिक धास्तावले - ambulance go to cemetery playing siren

अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने आज बऱ्याच रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाल्या. त्यामुळे, अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली.

ambulance go to cemetery playing siren
रुग्णावाहिका ताफा हिंदू स्मशानभूमी
author img

By

Published : May 19, 2021, 3:15 PM IST

अमरावती - अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने आज बऱ्याच रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाल्या. त्यामुळे, अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली.

हेही वाचा -अमरावतीतील कापड बाजारपेठेला लॉकडाऊनचा कोट्यावधींचा फटका

जिल्हा समान्य रुग्णालय येथील शव विच्छेदनगृह जवळून सायरन वाजत 15 ते 20 रुग्णवाहिका हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या. सायरनचा जोरदार आवाज करीत या रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भूतवश्वर चौक येथून हिंदू समशानभूमिकडे निघाल्या. इतक्या रुग्णवाहिका निघाल्याचे पाहून नागरिक चांगले धास्तावले.

रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू

शहरातील एका रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाली असताना त्याच्या सहकारी रुग्णवाहिका चालकांनी त्याच्या अंत्ययात्रेत रुग्णवाहिका नेऊन सहभाग घेतला. आपल्या सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना अनेक रुग्णवाहिका चलक सायरन वाजवत निघाल्याने अमरावतीकरांमध्ये दहशत निर्माण झाली. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवणे बेकायदेशीर असताना ऐन कोरोनाकाळात सायरन वाजवत 15 ते 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा - खतांच्या भाववाढीविरोधात बच्चू कडूंची 'थाळी बजाओ' आंदोलनाची हाक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.