ETV Bharat / state

रस्ते निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या खडी क्रशरमुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान - अमरावती शेती विषयक बातम्या

अमरावतीतून कौडन्यपूर, धामणगाव व परतवाडा या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी उभारण्यात आलेल्या खडी क्रशर मशीनमुळे आसपासच्या शेताचे मोठे नुकसान होत आहे.

खडी क्रशर मशीन
खडी क्रशर मशीन
author img

By

Published : Sep 30, 2020, 6:06 PM IST

Updated : Sep 30, 2020, 10:24 PM IST

अमरावती - एकीकडे परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करत असतानाच अमरावतीमधील काही शेतकरी हे निसर्गासोबतच मानवनिर्मित अशा एका मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. रस्ते बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या स्टोन क्रशर मशीनच्या प्रकल्पामुळे अमरावती तालुक्यातील मार्डी परिसरातील शेकडो हेक्टरवरील शेतातील पिकांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना एक रुपयाची मदतही या रस्ते बांधकाम कंपनीकडून मिळाली नाही.

आपल्या व्यथा मांडताना शेतकरी
अमरावती जिल्ह्यात सध्या मोठया प्रमाणात रस्ते काम सुरू आहे. यातच अमरावती-परतवाडा, अमरावती-कौडन्यपूर, अमरावती-धामणगाव, अशा तीन मार्गांचे शेकडो किलोमीटरच्या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या तिनही मार्गाच्या कामाचे मुख्य कंत्राट हे वेलफन्स कंपनीला देण्यात आले असून या कंपनीने हे काम रवी इन्फ्रा या कंपनीला दिले आहे. या कंपनीने मार्डीजवळील परिसरात जागा अधिग्रहित करून तिथे गिट्टीखदान व मशिनरी उभे केले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून दिवस-रात्र चालणाऱ्या मशीन मधून निघणाऱ्या धुळीमूळे शेकडो हेक्टरवरील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही दोन स्टोन क्रशर उभारणी वेळी कंपनीने शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.मार्डी परिसरातील 20पेक्षा अधिक एकरावर वसलेल्या या स्टोन क्रशरमुळे परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणावर दगड जातात. त्यामुळे जमीनीची सुपिकता नष्ट होत असून मागील दोन वर्षांपासून जमीन पडीक झाली असल्याने कंपनी विरोधात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई झाली नसल्याचे शेतकऱ्यांच म्हणणे आहे. शेतकऱ्यांची तक्रार आम्हाला प्राप्त झाल्यास आम्ही कंपनीवर कारवाई करू, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.एकीकडे आधीच शेतकरी विविध संकटांनी मेटाकुटीला आला असताना या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेकडो एकर जमिनीची सुपिकता ही नष्ट होत चाललेली आहे. कंपनीने पैसे देण्याचे आश्वासन अद्यापही पाळले नाही. त्यामुळे या कंपनीवर प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा - अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी; नायब तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

Last Updated : Sep 30, 2020, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.