अमरावती - सुजलाम सुफलाम भारत देशामध्ये आजही माणुसकी आणि इमानदारी बहुतांश नागरिकांमध्ये अस्तित्वात आहे. अनेकदा आपण रिक्षाचालकांची प्रामाणिकता, बस चालकाची प्रामाणिकत, ड्रायव्हरची प्रामाणिकता अशा आशयाच्या बातम्या बघत असतो. आता पुन्हा एकदा अमरावतीच्या मेळघाटातील धारणीमध्ये हातावर पोट असणाऱ्या गरीब ड्रायव्हरची प्रामाणिकता समोर आली आहे. या ट्रक चालकाच्या खात्यात चुकीने आलेले पैसे या ट्रक चालकांने परत केले आहे. ही थोडी रक्कम नसून तब्बल १४ लाख ६७ हजार रूपये एवढी आहे.
...आणि परत केले 14 लाख रुपये -
अमरावतीच्या धारणी शहरातील रहिवासी मोहम्माद आरिफ अब्दुल अजीज यांची घरची परिस्थिती जेमतेम कुटुंबाचा गाढा चालवण्यासाठी त्यांनी ट्रक चालवायला सुरुवात केली. ट्रक चालवून मिळणाऱ्या पैशात ते आपल घर चालवतात. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला आणि त्यांची झोपच उडाली. थोडे थोडके नव्हे, तर तबल १४ लाख ६७ हजार त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मॅसेज आला. एखाद्याने तत्काळ पैशाची विलेव्हट लावली असती. पण तिथे मोहम्माद आरिफ अब्दुल अजीज यांची प्रामाणिकता जागी झाली. एवढे मोठे पैसे खात्यात कुणी टाकले व कसे काय आपल्या खात्यामध्ये आले. याबाबत माहिती देण्याकरिता ते धारणी स्टेट बँकमध्ये गेले. आरिफ यांनी संबंधित शाखा व्यवस्थापकाला मोबाईल आणि आपली खाता बुक दिले आणि सांगितले की, माझ्या खात्यामध्ये 14 लक्ष 67 हजार रुपये आले आहे. आलेले पैसे कुणाचे आहे व कसे काय माझ्या खात्यात आले ते मला माहित नाही, हे पैसे माझे नाही असे त्यांनी सांगितले. यानंतर धारणी स्टेट बँकेला आयसीआयसीआय बँक अंधेरी शाखेवरून एक मेल आला आणि पैश्याची खात्री झाली आणि पैसे परत करण्यात आले.
हेही वाचा - सरकार पाडण्यासाठी नारायण राणेंनी अधिक मुदत दिल्याने त्यांचे आभार, जयंत पाटलांचा खोचक टोला