ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात गृहविलगीकरण बंद

गृह विलगीकरणाच्या नावाखाली ग्रामीण भागात घरात असणारे रुग्ण घराबाहेर पडतात. काही जण तर शेतीची कामेही करत असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाग्रस्तांचे असे बेफिकर वागणे कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत असून यामुळे ग्रामीण भागात कोरोना वेगात पसरते आहे. आता यावर पर्याय म्हणून राज्य शासनाने 18 जिल्ह्यातील गृहवीलगीकरण बंद केले असून या निर्णयामुळे कोरोना आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

गृह विलगीकरण
गृह विलगीकरण
author img

By

Published : May 27, 2021, 9:00 PM IST

अमरावती - शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोना वाढतो आहे. ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना रुग्णांचे गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून 25 मेपासून नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुगांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.

'अशी' आहे ग्रामीण भागातील रुग्णसंख्या

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. अमरावतीत 28 एप्रिलला कोरोना रुग्णांची संख्या 946वर पोहचली. त्यानंतर ही संख्या वाढत गेली आणि 8 मे रोजी कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजार 241वर गेला. 8 ते 17 मेपर्यंत दररोज हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामध्ये शहारापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक होती. सद्यस्थिती जिल्ह्यात 6 हजार 549 कोरोना रुग्ण असून यापैकी ग्रामीण भागात 4 हजार 872 रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात रुगांना घरी राहण्यास बंदी

गृह विलगीकरणाच्या नावाखाली ग्रामीण भागात घरात असणारे रुग्ण घराबाहेर पडतात. काही जण तर शेतीची कामेही करत असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाग्रस्तांचे असे बेफिकर वागणे कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत असून यामुळे ग्रामीण भागात कोरोना वेगात पसरते आहे. आता यावर पर्याय म्हणून राज्य शासनाने 18 जिल्ह्यातील गृहवीलगीकरण बंद केले असून या निर्णयामुळे कोरोना आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर

जिल्ह्यात वरुड, चिखलदरा, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदुर रेल्वे, मोर्शी, धामणगाव रेल्वे, चंदूरबाजार, नांदगाव खंडेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक कोविड सेंटर आहे. तर अचलपूरला दोन, अमरावतीत तीन कोविड सेंटर आहेत. या सर्व 15 कोविड सेंटरमध्ये एकूण 1305 बेड उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात प्रत्येकी 10 याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा कोविड सेंटर म्हणून सुरू करण्यात आले असून यांची एकूण संख्या 140 इतकी आहे. हे सर्व कोविड सेंटर ग्रामीण भागातील गंभीर नसणाऱ्या रुग्णांना इतरांपासून दूर ठेवण्यास पुरेसे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कोविड सेंटर वाढवत आहेत कोरोनाग्रस्तांचे आत्मबळ

वलगाव येथील कोविड रुग्णालयात एकूण 75 बेड असून सध्या याठिकाणी अमरावती आणि भातकुली तालुक्यातील गावांमधील कोरोनाग्रस्तांना ठेवण्यात आले आहे. विस्तीर्ण आणि शांत ठिकाणी असणाऱ्या या सेंटरवर असणाऱ्या रुग्णांचे दिवसातून तीन वेळा ऑक्सिजन पातळी तपासली जाते. उत्तम जेवण, नाश्ता रुग्णांना पुरविला जातो. डॉक्टर प्रत्येक रुग्णांची तापासणी करतात. ज्या रुग्णांची प्रकृती खालावली त्यांना रुग्णालयात घेवून जाण्यासाठी कोविड सेंटरवर रुग्णवाहिकाही सज्ज आहेत.

हेही वाचा- पदोन्नती आरक्षणाच्या विरोधातला जीआर रद्द करण्याच्या मुद्यावर काँग्रेस आग्रही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.