अमरावती : देशात हिंदू समाज धोक्यात असल्याचा उद्गार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी काढले आहे. ते आज आमरावती येथे हिंदू धर्मशभेच्या कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वादाने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी पाकिस्थानला हवाई हल्ला करुन नेस्तनाबुत केले पाहीजे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
गरीब हिंदूंना मोफत उपचार : भारतातील हिंदू आरोग्यमुक्त राहावे यासाठी विशेष डॉक्टरांच्या टीमचे गठन सुरू आहे. यासाठी इंडिया हेल्पलाइनचे काम सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पामध्ये दहा हजार पेक्षा डॉक्टरांना जोडण्यात आले. आहे या माध्यमातून देशातील गरीब हिंदूंचा मोफत उपचार करण्याची ही योजना आहे. देशातील कोणतीही हिंदू हा भूकेपासून आणि आरोग्य पासून वंचित राहू नये यासाठी हिंदू धर्मसभा महत्त्वाचे कार्य करणार असल्याचे त्यांनी प्रविण तोगडिया यांनी सांगितले.
एक मुठ्ठी अनाज : आज अमरावतीलासुद्धा या संदर्भात काही डॉक्टरांशी गाठीभेटी घेणार असल्याचे तोगडिया यांनी सांगितले. देशातील खेड्या पाड्यातमध्ये जाऊन रोगमुक्त जीवनशैली समजावून सांगणे. तसेच रक्त,बीपी यांची तपासणी यासंदर्भात ही हेल्पलाइन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील कोणताही हिंदू भुखा राहू नये यासाठी 'एक मुठ्ठी अनाज' या संकल्पनेवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षित सन्मानित हिंदूनाच समोर आणण्याची ही संकल्पना असल्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हिंदू एकत्रित : राम मंदिर बनवण्यामध्ये मराठा, कुशवाह, ठाकूर, पंडित या सगळ्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्यांच्यामुळेच राम मंदिराचे निर्माण कार्य मोठ्या स्वरूपात सुरू आहे. भारतातील हिंदू हा आता सार्वत्रिकरित्या एकत्रित आलेला आहे. परंतु, त्याला आता इतर कारणांमुळे विभाजित करू नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली. आपले हिंदुत्व कशा प्रकारचे आहे असा, प्रश्न तोगडिया यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या हिंदू मुलीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा आमचे हिंदुत्व हे आणखी कणखर होते. त्यामुळे हिंदुत्वाची ठोस अशी भाषा सांगणे कठीण आहे. जो मंदिरात जातो तो हिंदू आहे, जो मंदिरात जात नाही तो सुध्दा हिंदू आहे. पण हनुमान चालीसा येणे गरजेचे आहे. ज्यांना येत नसेल त्यांनी तो शिकून घेतली पाहिजे असे, त्यांनी आवर्जून सांगितले.
सरसंघचालकाविषयी टिप्पणी नाही : जाती देवांनी बनवलेल्या नाहीत, जाती पंडितांनी बनवल्या आहेत. देवासाठी आपण सर्वजण एक आहोत. आपल्या देशाला वाटून पहिल्यांदा आक्रमण झाली. यानंतर बाहेरुन आलेल्या लोकांनी याचा फायदा घेतला, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले होते. त्या वक्तव्यावर तोगडिया म्हणाले की, ते सरसंगी चालक आहेत. त्यांच्याविषयी मी काय टिप्पणी करणार. भारतातील हिंदू जगला पाहिजे, वाढला पाहिजे. यासाठी तत्पर असणाऱ्या डॉक्टर तोगडिया यांच्याकडे बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या प्रश्नांवरती मात्र काहीच उत्तर नव्हते.
हेही वाचा - Nana Patole : प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी नाना पटोले दिल्लीला जाणार? ऐका ते काय म्हणाले