ETV Bharat / state

मध्यप्रदेशमधून येणारा गुटखा अंजनगाव पोलिसांनी पकडला

author img

By

Published : Mar 3, 2022, 8:14 PM IST

परतवाडा मार्गे आकोट अकोलाकडे जाणारा मध्य प्रदेशातील गुटखा अंजनगाव पोलिसांनी नाकाबंदी करून पकडला आहे. यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. एकूण ७ लक्ष १ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Gutkha seized
अंजनगाव पोलिसांनी जप्त केला गुटखा

अमरावती - परतवाडा मार्गे आकोट अकोलाकडे जाणारा मध्य प्रदेशातील गुटखा अंजनगाव पोलिसांनी नाकाबंदी करून पकडला आहे. यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. या घटनेने अंजनगाव सुर्जी शहरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुटखा केला जप्त -

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आज अंजनगाव येथील नवीन बस स्थानक परिसरात परतवाडा मार्गावर सापळा रचला. मध्यप्रदेश येथील बैतुल जिल्ह्यातील सावलमेंढा येथून आकोट आकोला येथे गुटखा घेऊन जाणाऱया झायलो (एम एच ४६ एन २१५४) गाडीला हात दाखवून थांबवले. त्यानंतर तपासले असता या गाडीमध्ये वाह पान मसाला ७५० पाकीटे त्याची किमंत ९० हजार, जैविक तंबाखू ७५० पाकीट किंमत ११२५०, विमल पान मसाला४०० किंमत ७९२००, वि१ तंबाखू ४०० पाकीट किंमत ८८००, पानबहार ५०० पाकिट ११२५०० किमंत असा एकूण ३ लक्ष १७५० रुपयाचा गुटखा व सुगंधित आढळला. संपूर्ण मालासह मालाची वाहतूक करणारी गाडी झायलो किंमत ४ लाख असा एकूण ७ लक्ष १ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अकोला शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी संतोष गोविंदराम हिराणी (वय ३६) यास ताब्यात घेतले. त्याने हा माल बैतूल येथिल मनोज मोठवाणी यांच्याकडून घेतल्याचे सांगितले, अंजनगाव पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकारी माहिती देऊन सदर माल तपासला व अन्नसुरक्षा प्रतिबंध कायदा अंतर्गत आरोपीवर भादवी कलम १८६,२७२,२७३,३२८ सह कलम अन्नसुरक्षा मानके कायदा२००६ अन्वये कारवाई केली.

अवैध गुटखा तस्करीत महिलेचा उपयोग -

मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सावलमेंढा येथून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध गुटखा तस्करीच्या व्यवसायात वाहनांमधून पोलिसांना चकवा देण्याकरिता वाहनांमध्ये महिलांनासुद्धा बसविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत जप्त केलेल्या मालाचे नमुने घेऊन उर्वरित माल अंजनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा अन्नसुरक्षा अधिकारीआर. डी. कोकटवाल यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.