अमरावती - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कळकळात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने मेळघाटातील टेब्रूसोडा येथील नानाजी दहिकर (वय ७०) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. नानाजी शेतात गुरे चरण्यासाठी गेलेले होते.
अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कळकळात पाऊस पडला. नानाजी याच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी नानाजी यांचा मृतदेह अचलपूर येथे शवविच्छेदन करण्यास पाठविले. या संदर्भात अधिक तपास पोलीस करताहेत.
अमरावतीत वीज पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू;चांदुर बाजार तालुक्यातील घटना
चांदूर बाजार तालुक्यात गुरुवारी (10 सप्टेंबर) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान दीपक नारायण कावनपूरे आणि मुलगा सुमित हे दुचाकीवरून ते गावाकडे जात होते. जोरदार पाऊस सुरू असल्याने पावसापासून बचावासाठी ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली थांबले. मात्र, काही वेळातच झाडावर वीज कोसळली. यात झाडाखाली उभे असलेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.