ETV Bharat / state

मेळघाट : मनिषाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पै-पै जमवली; पण... - water crises

तिच्यासाठी लोकवर्गणी केली, पण नियती पुढे काहीच चालले नाही.

मनिषाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पै-पै जमवली; पण...
author img

By

Published : Jun 28, 2019, 5:45 PM IST

Updated : Jun 29, 2019, 2:43 PM IST

अमरावती - मागील आठवड्यात चिखलदारा तालुक्यातील मोथा गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली. हंडाभर पाणी आणायला गेलेल्या पंधरा वर्षीय मनिषाची १० दिवसांपासून सुरू असलेली मृत्यशी झुंझ अखेर संपली. आरोग्य योजनेचा गाजावाजा करणाऱ्या एकाही योजनेचा तिला फायदा झाला नाही. गावकऱ्यांनी तिच्यासाठी लोकवर्गणी केली, पण नियती पुढे काहीच चालले नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे मेळघातील आदिवासी कुटुंबातील मनीषा धांडेकरची.

अमरावती शहरापासून जवळपास ७० किलोमीटर अंतरावर आणि चिखलदारावरून परतवाडा रोडवर ७ किलोमीटर अंतरावर मोथा गाव आहे. सातशे लोकसंख्येच्या या गावात गवळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. याच गावात गुंडभर पाण्यासाठी मनिषाला आपला जीव गमवावा लागला आहे.

मेळघाट : मनिषाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पै-पै जमवली; पण...

यावर्षी मेळघाटात भीषण पाणी टंचाई आहे. मोथा गावालाही पाणी टंचाईचे चटके खावे लागत आहे. गावात एक विहीर आहे. त्या विहिरीत टँकरने पाणी सोडल्यानंतर गावकरी तेथून दूरवर पाणी नेतात अशातच मनिषाही एक गुंड पाणी आणायला गेली होती. अचानक ती विहिरीत पडली आणि डोक्याला जबर मार लागल्याने तिची जगण्याची धडपड सुरू झाली. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाने तिला चिखलदाराला नेले. तेथून अमरावतीला, पण डोक्याला मार जास्त असल्याने तिला नागपूरला भरती करावे लागले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, गावकऱ्यांनी आपल्या परीने पैसे जमा केले. पण नशीबापुढे गावकऱ्यांची मदत अन् प्रार्थनाही कामी आली नाही.

धांडेकर कुटुंबाकडे जमीन नाही, राहायला पक्क घर नाही, घरकूल योजनेचा लाभ नाही, अशा परिस्थितीत मिळेल ते काम करून हे कुटुंब गुजराण करते. भीषण पाणीटंचाईने मनिषाचा बळी घेतल्यानंतरही तिच्या वेदना संपल्या नव्हत्या. तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. एवढी वाईट परिस्थिती या कुटुंबाची आहे.

शासनाकडून मेळघाट सारख्या दुर्गम भागासाठी लाखो रुपये खर्च केल्याच्या पोकळ घोषणा केल्या जातात. पण वास्तविक स्थिती मात्र खूप वेगळी आहे. गुंडभर पाण्यासाठी जीव गमावणाऱ्या मनिषाच्या कुटुंबाला साधी भेट द्यायची तसदीही इथल्या राजकीय व्यवस्थेतला आली नाही.

Intro:गावातील नागरिकानीं तिला वाचवण्यासाठी पैसेही गोळा केले. पण मेळघाटच्या भीषण पाणीटंचाईन  शेवटी मनिषाचा  जीवच घेतला.
--------------------------------------------
ETV भारत चा ग्राउंड रिपोर्ट.
अमरावती अँकर
मागील आठवड्यात अमरावतीच्या चिखलदारा तालुक्यातील मोथा गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली.गुंडभर पाणी आणायला गेलेल्या पंधरा वर्षीय मनिशाची दहा दिवसा पासून सुरू असलेली मृत्यशी झुंझ अखेर संपली होती.आरोग्य योजनेचा वाजागाज्या करनाऱ्या एकाही योजनेचा तिला फायदा झाला नाही .अखेर गावकऱ्यांनी तिच्या साठी लोकवर्गणी केली.पण नियती पुढे काहीच  चालल नाही.ही दुर्दैवी कहाणी आहे.मेळघातील आदिवासी कुटुंबातील मनीषा धांडेकर ची पाहूया एक रिपोर्ट.

Vo-1
अमरावती शहरापासून जवळपास सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि चिखलदारा वरून परतवाडा रोड वर सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोथा गावात आम्ही पोहचलो. सातशे लोकसंख्येच्या या गावात गवळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे दूध जरी मुबलक असल तरी पाण्यासाठी मात्र या गावातील मनिषाला आपला जीव गमवावा लागला .आम्ही गावात पोहचताच काही तरुणांना मनिषाच्या घराचा पत्ता विचारला पुढे निघत आम्ही मानिशाच्या घरासमोर पोहचलो होतो. आमच्या समोर उभे होता तो ज्याने गुंडभर पाण्यासाठी आपल्या हाता तोंडाशी आलेल्या मुलीला कायमच गमावून बसलेला दुर्दैवी बाप. मुलगी गेल्याच दुःख सामावून फाटक्या झोपडीला ठिगळ लावण्याचे काम ते करत होते.मग आत गेलो आणि सुरू झाली .कायम गरिबीचे चटके खाणाऱ्या त्या जन्मदात्या बापाची दुर्दैवी कहाणी.

बाईट-1-वडील

Vo-2
या वर्षी मेळघाटात भीषण पाणी टंचाई आहे.मोथा गावालाही पाणी टंचाईचे चटके खावे लागत आहे.गावात एक विहीर आहे.त्या विहरीत टँकर ने पाणी सोडल्या नंतर गावकरी तेथून दूरवर पाणी नेतात अशातच मानिशाही एक गुंड पाणी आनायला गेली होती.अचानक ती विहरीत पडली आणि डोक्याला जबर मार लागल्याने तिची जगण्याची धडपड सुरू झाली. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाने तिला चिखलदारा ला नेलं तेथून अमरावतीला पण डोक्याला मार जास्त असल्याने तिला नागपूर ला भर्ती करावं लागलं.तिथे तीच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली ,गावकऱ्यांनी आपल्या परीने पैसे जमा केले. पण नशीबापुढे गावकऱ्यांची मदत अन प्रार्थनाही कामी आली नाही.मनीषा ला एक मोठी बहीण आहे.शिकून काहीतरी बनाव अस तीच स्वप्न होत .पन अठरा विश्व दरिद्रीने तीला शिक्षण अर्ध्यावर सोडाव लागलं.

बाईट-2-मनीषाची बहीण

Vo-3 
धांडेकर कुटुंबाकडे जमीन नाही,राहायला पक्क घर नाही,घरकूल योजनेचा लाभ नाही.अशा परिस्थितीत मिळेल ते काम करून हे कुटूंब गुजराण करते.भीषण पाणीटंचाईने मानिशाचा बळी घेतल्यानंतरही तिच्या वेदना संपल्या नव्हत्या तीचा मृतदेह घरी आणण्यासाठी सॊशल मीडियाचा आधार घ्यावा लागला .एवढी वाईट परिस्थिती या कुटूंबाची आहे.ज्या आजीने मनीषाच्या हातावर खेळवल तिला लहानाची मोठी होताना पाहल ती अचानक निघून गेल्याने ती व्यथित झाली आहे.आता शासनाने काही तरी मदत करावी ही मागणी ती करत आहे.

बाईट--3-मानिषाची आजी

शासनाकडून मेळघाट सारख्या दुर्गम भागासाठी लाखो रुपये खर्च केल्याच्या पोकळ घोषणा केल्या जातात.पण वास्तवीक स्थिती मात्र खूप वेगळी आहे.गुंड भर पाण्यासाठी जीव गमावणार्या मनींषाच्या कुटूंबाला साधी भेट द्यायची तसदीही इथल्या राजकीय व्यवस्थेतला आली नाही.  मराठीत एक म्हण आहे न जो रोज मरे त्याच्या साठी कोण रडे.असो पैशेवाले विकत पाणी घेऊन तहान भागवेल पन या मानिशा सारख्या निष्पाप मुलीला तर आपला जीव गमवावा लागला न.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jun 29, 2019, 2:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.