अमरावती अमरावती शहरात आंध्रप्रदेशातून ट्रकद्वारे आणलेला गांजा (Ganja seized in Amravati) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Amravati Local Crime Branch) चांदुर रेल्वे-अमरावती मार्गावर शुक्रवारी रात्री जप्त केला. 435 किलो या गांजाची किंमत 52 लाख 20 हजार 600 रुपये इतकी आहे. कारवाई दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने एक आयशर ट्रक, फोर्ड फियस्टा आणि टाटा इंडिका अशा दोन कार जप्त केल्या. यासोबत एकूण चार जणांना अटक (Four people arrested ganja case) केली. अमरावती शहरात आंध्रप्रदेशातून पांढरकवडा-यवतमाळ-बाबुळगाव-चांदुर रेल्वे मार्गे एक ट्रक गांजा घेऊन (Truck carrying marijuana) येतो आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
गांजाच्या ट्रकला दोन कारचे संरक्षण विशेष म्हणजे या ट्रकच्या संरक्षणासाठी ट्रकच्या समोर एक आणि ट्रकच्या मागे एक अशा दोन कार सोबत असल्याचेही स्थानिक गुन्हे शाखेला कळाले होते. मार्गात कुठे धोका आहे का याची माहिती दोन्ही कारमध्ये स्वार असणाऱ्या व्यक्ती जाणून घेऊन ट्रकचा मार्ग सुकर करण्याचे काम करीत होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी आपल्या पथकासह गांजा घेऊन येणाऱ्या ट्रकला मालखेड फाट्याजवळ अडविले. ट्रकची झडती घेतली असता प्लास्टिकच्या कॅरेटखाली पोत्यांमध्ये 55 ठोकळे खाकी रंगाच्या सेलोटेपने झाकून दोन पोत्यांमध्ये गांजा भरल्याचे आढळले. पोलिसांनी याची तपासणी केली असता त्यामध्ये 435.50 किलोग्रॅम वजनाचा गांजा (Ganja weighing 435 kg) असल्याचे आढळून आले. या प्रकरणात चार आरोपींना अटक (Four people arrested ganja case) करण्यात आली आहे.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी (Police officers involved in operation) पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव आणि चांदुर रेल्वेचे उपविभागिय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक तपन कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलीस अंमलदार संतोष मुदाने, रवींद्र बावणे, बळवंत दाभणे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, मूलचंद भांबुरकर,मोहन मोरे, अमोल देशमुख, प्रशांत ढोके,दीपक सोनाळेकर, विलास रोकडे, निलेश डोंगरे, नितीन कळमकर, प्रमोद शिरसाठ, सायबर सेलच्या सरिता चौधरी हे या कारवाईत सहभागी होते.