अमरावती - शहरातील शारदा नगर परिसरातील घरसमोरून एका चार वर्षीय बालकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना आज रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. नयन मुकेश लुनिया, असे अपहरण झालेल्या चार वर्षीय बालकाचे नाव आहे. अपहरणकर्त्यांमध्ये एक मुलगा व एका मुलीचा सामावेश असून अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
अपहरणाचे कारण अस्पष्ट -
आज सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास चार वर्षीय चिमुकला नयन हा घरातील एका महिला सदस्याचे बोट धरून चालत असताना मागून एक व्यक्तीने येऊन नयनला घेऊन फरार झाला. अपहरणकर्ते हे दुचाकीवरून आल्याची प्राथमिक माहिती आहे. चार वर्षीय चिमुकल्या नयनचे अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी झाले, याचा तपास सध्या सुरू आहे. परंतु रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडलेल्या अपहरणाच्या थराराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.