अमरावती - महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, अमरावती विभागातील मोजक्याच शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, तर अनेकांची कर्जमाफी झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भात सावळा गोंधळ झाला आहे, असा आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शासनावर केला आहे.
माहिती देताना शेतकरी व माजी कृषीमंत्री बोंडे अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यातील 6 लाख 29 हजार 126 शेतकऱ्यांचे आधार अपलोड झाले आहेत. 2 लाख 82 हजार 977 शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिक झाले आहेत, तर अमरावती जिल्ह्यात मोजक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. 22 मे रोजी राज्यसरकारने शासन आदेश काढून राज्याची आर्थिक स्थिती खालावली असून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यासारखी नसल्याचे सांगितले. मात्र, खरिप हंगामासाठी केवळ तीन टक्के शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला आहे. मात्र, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा झाला नाही, तर शेतकरी सावकाराकडे जाऊ शकतो, अशी भीती माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी वर्तविली आहे.
हेही वाचा - '...आत्महत्या करण्याची वेळ आलीय आमच्यावर'