अमरावती - मासेमारी करणाऱ्या आदिवासी युवकाला वान व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्याकडून गरम लोखंडी forest employee hot iron rod hit fishing tribal youth सळईने चटके देण्यात आले. या प्रकारामुळे मेळघाटात tribal youth Melghat Amravati खळबळ उडाली आहे. संबंधित वन कर्मचाऱ्यांविरोधात धारणी पोलीस Dharni Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश गोरेलाल मावस्कर असे तरुणाचे नाव आहे. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत.
मासेमारीसाठी प्रतिबंधित असणाऱ्या धरणावर गेले होते तिघेजण : अंकुश गोरेलाल मावस्कर (२५) या धुळघाट रेल्वे येथील रहिवासी असणाऱ्या जखमी युवकाचे नाव आहे. अंकुश हा गावातीलच आनंद कास्देकर आणि पप्पू चव्हाण या दोन सहकाऱ्यांसोबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत वान वनपरिक्षेत्रातील वान धरणावर गेले होते. मासेमारी करण्यासाठी त्यांनी जाळे टाकले. या धरणावर मासेमारी प्रतिबंधित आहे. अवैध मासेमारी केल्याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुमारे सात ते आठ कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारहाण करून गरम सळईचे चटके दिल्याचा आरोप अंकुश मावस्कर याने केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते आले मदतीला धावून : राणीगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वहीद खान पठाण यांनी जखमी अंकुशला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती वहीद खान पठाण यांनी दिली आहे. गरम सळाखीचे चटके दिल्यानंतर आपण जखमी अवस्थेत कशीबशी वनकर्मचाऱ्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि जंगलातून गावी परतल्याचे अंकुश मावस्कर याचे म्हणणे आहे.
वन कर्मचाऱ्यांनी दोघांना घेतले ताब्यात : अंकुश मावस्कर याला वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, अवैध मासेमारी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अंकुशने केलेल्या आरोपींची चौकशी व्हावी, आणि त्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणात धारणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.