अमरावती- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पाश्वभूमीवर जेलमध्ये असलेल्या कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये. यासाठी राज्य सरकारने राज्यातील जेलमध्ये असलेल्या 38 हजार हजार कैद्यापैकी 11 हजार कैद्यांना घरी सोडले. मात्र, लाॅकडाऊनमुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे वऱ्हाड संस्थेने पुढाकार घेऊन त्यांना घरपोच अन्नधान्य, किराणा व आर्थिक मदत दिली आहे.
हेही वाचा- 'मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे हे कोरोनावरील औषध नाही'
वऱ्हाड सामाजिक संस्था हातातून कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या जेलमधील कैद्यांच्या व त्यांच्या कुटुंबासाठी काम करत असते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सात वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैद्यांना जामिनावर सोडले आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे त्यांना कामधंदा नसल्याने त्यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ होत आहे. त्यामुळे या दृष्टीने वऱ्हाड या संस्थेच्या माध्यमातून त्या कैद्यांना घरपोच किराणा,अन्न धान्य व अर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत या संस्थेने विदर्भातील 200 कैद्याना मदत केल्याचे संस्थेचे पदाधिकारी प्रा. रवींद्र वैद्य यांनी सांगितले आहे.