अमरावती: कौंडण्यपूर येथे एकाच ठिकाणी एकूण पाच कदंबची वृक्ष आहेत. कौंडण्यपूर मध्ये इस्कॉनने बांधलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मंदिर परिसरातील हे वृक्ष खूप जुने आहे. रहिवासी यांच्या आजोबा-पंजोबाच्या काळापासून हे वृक्ष आहे. या कदंब वृक्षाला केली कदम वृक्ष असे म्हणतात अशी माहिती इस्कॉन मंदिरातील पुजारी अद्भुत कृष्णदास यांनी दिली. भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीला कौंडण्यपुरेतून नेण्यासाठी आले होते, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण या 'केली कदंब' वृक्षाखाली थांबले होते.
पाच हजार वर्ष जुने वृक्ष: द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी 'केली कादंब" या वृक्षाखाली अनेक लीला केले आहेत. भगवान श्रीकृष्ण लहानपणी आपला सवंगड्यांसह चेंडू खेळताना त्यांचा चेंडू जेव्हा यमुना नदीत गेला, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने या केली कदम वृक्षावरूनच यमुना नदीत उडी मारली होती. या वृक्षाखाली जप आणि ध्यान चांगल्या प्रकारे होते अशी माहिती देखील अद्भुत कृष्णदास यांनी दिली. कौंडण्यपूर येथील रहिवासी तसेच येथील इस्कॉन मंदिराचे पुजारी पदाधिकारी हे वृक्ष पाच हजार वर्ष जुने आहे असे सांगतात.
कार्बनडेटिंगद्वारे मोजता येणार वृक्षाचे वय: कौंडण्यपूर येथील कदंबचे वृक्ष 5 हजार वर्ष जुने असल्याचे सांगण्यात येते. या झाडाची खरच नेमके किती वय आहे यासाठी आपल्याला वैज्ञानिक पद्धत वापरावी लागेल, असे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर अर्चना मोहोड़ म्हणाल्या. वृक्षाची नेमके वय किती हे जाणून घेण्यासाठी सध्या कार्बनडेटिंग हा योग्य पर्याय उपलब्ध आहे. वृक्षाचे कार्बनडेटिंग करण्यासाठी भारतात अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लेबोल्ट्री, लखनऊ येथील बिरबल सहानी इन्स्टिट्यूट आणि मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमध्ये कार्बनडेटिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कार्बनडेटिंग करण्यासाठी साधारण दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो. या वृक्षाच्या खोडाचे 100 ते 500 ग्रॅम सॅम्पल कार्बनडेटिंगसाठी लागतात. या सॅम्पलचे कोळशामध्ये परिवर्तन करून आणि या कोळशाचे कार्बनडेटिंग करून या झाडाचे नेमके वय किती हे कळते, अशी माहिती देखील डॉ. अर्चना मोहोड यांनी दिली.
कौंडण्यपूर येथील कदंबचे वृक्ष 5 हजार वर्ष जुने आहे. झाडाची खरच नेमके किती वय आहे, यासाठी कार्बनडेटिंग हा योग्य पर्याय आहे. वृक्षाचे कार्बनडेटिंग करण्यासाठी भारतात अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लेबोल्ट्री सुविधा उपलब्ध आहे. - डॉ. अर्चना मोहोड़
कदंबचे असे आहे वैशिष्ट्य: कदंब हे वृक्ष भारतात पूर्व हिमालयाच्या पायथ्यापासून बंगाल ओरिसा आणि आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही भागात आर्द्र पानझडी जंगलात आढळते. साधारणतः दहा ते पंधरा मीटर उंचीपर्यंत हे वृक्ष वाढते. निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. निसर्गात पूर्ण वाढलेल्या वृक्षाची उंची 30 मीटर पर्यंत जाते. कदंबच्या ताट राखाडी रंगाच्या बुंध्यावर काटकोनात पसरलेल्या फांद्यांमुळे वृक्षाचा आकार छत्रीसारखा दिसतो. या वृक्षाची पाने एकदम गळत नसल्यामुळे पांगळीचा वृक्ष असूनही संपूर्ण निष्पर्ण वृक्ष कुठेही आढळत नाही. कदंब या वृक्षाची पाने आंब्याच्या वृक्षाच्या पानांच्या आकाराची मात्र जरा रुंद असतात. ही पाने पुढून हिरवीगार आणि मागच्या बाजूने काहीशी फिकट लव युक्त असतात.
कदंब फुलण्याचा संबंध पावसाची: पानांवरच्या शिरा उठून दिसतात. पण वृक्षाची खरी मजा त्यांच्या फुलांमध्ये आहे. कदंबची फुले अतिशय सुगंधित असतात. संस्कृत काव्यात कदंब फुलण्याचा संबंध पावसाची जोडला आहे. ढगांचा गडगडात ऐकल्यावरच कदम फुलतो असे म्हणतात. कदंबाचे एक फुल म्हणजे फुलांचा गोळाच असतो, जणू एखाद्या चेंडूवर बारीक बारीक फुले सर्व बाजूंनी टोचली तर तो कसा दिसेल तसेच कदमचे फुल दिसते. हे फुल दिसायला फार सुंदर आहे. अगदी सोनेरी केशरी रंगाचे गुबगुबीत गेंदेदार भिजलेल्या कदंब वृक्षाच्या खाली उभे राहिले की, मधमाशांचे गुंजन अगदी स्पष्ट ऐकू येते. पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष असल्याने मधमाशा हमखास कदंबच्या शोधात येतात. कदंबच्या फुलांसारखीच फळ देखील लाडू सारखी गोल असतात. फळे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पिकतात, त्यांना किंचित आंबट चवही असते. या फळांची सर्वात जास्त मजा वटवाघुळ लुटतात. वटवाघुळामार्फतच कदंब वृक्षाच्या बीज प्रसार होतो.
हेही वाचा -