अमरावती - विदर्भातील सर्वात पहिल्यांदा शेतकरी कुटुंबाची सामूहिक आत्महत्या चिलगव्हाण ( First farmers suicide in Vidarbh ) या गावात करपे कुटुंबियांनी ( Korape family suicide in Amravati ) केली होती. या घटनेचा स्मरणार्थ आणि शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळाव्यात, यासाठी अमरावती पंचवटी चौक येथे शेतकर्यांच्यावतीने आज एक दिवसीय अन्नत्याग ( Farmers hunger strike in Amaravati ) आंदोलन करण्यात आले आहे.
34 वर्षांपूर्वी कोरके कुटुंबीयांनी उचलले टोकाचे पाऊल-
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण परिसरात साहेबराव करपे यांची सव्वाशे एकर शेती होती. ते स्वतः गावाचे सलग 15 वर्ष सरपंच होते. आधुनिक शेतीकडे त्यांचा कल होता. मात्र, बँक आणि खासगी कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. एमएससीबीने त्यांच्या घरची आणि शेतीची वीज कापली होती. यामुळे साहेबराव करपे हे खचून ( Sahebrao Karape Sucide case ) गेले होते.
हेही वाचा-Chandrakant Patil on MIM : एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेला तरी काहीच फरक पडणार नाही - चंद्रकांत पाटील
सामूहिक आत्महत्येमुळे हादरला महाराष्ट्र
19 मार्च 1986 ला पत्नी मालतीसह मुली विश्रांती, मंगला, सारिका आणि भगवान ह्या मुलांना यात्रेला जातो असे सांगून वर्धा जिल्ह्यातील दत्तापूर आश्रमात पोचले. या ठिकाणी अस्वस्थ असणाऱ्या साहेबराव कोरपे यांनी विषारी घटक लावलेली भाजी तिन्ही मुलींना खायला दिली. मुलाला विष पाजले. चारही मुलांचा जीव गेल्यानंतर पत्नी मालती आणि त्यानंतर साहेबराव करपे यांनी स्वतःला संपविले. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावात शोककळा पसरली. तर संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्यामुळे हादरून गेला होता. सरकारची शेतकरी विरोधी धोरणे व त्यातून शेती व्यवसायात आलेले अपयश हे या सामूहिक आत्महत्येचे मुख्य कारण होते.
हेही वाचा-ICC Womens World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाची सेमिफायलमध्ये धडक; भारतावर 6 विकेट्सने मात
अमरावतीत पंचवटी चौकात शेतकऱ्यांचा अन्नत्याग
19 मार्च 1986 ला विदर्भात झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या निमित्ताने अमरावती शहरातील पंचवटी चौक येथे शेकडो शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन ( Farmer family suicide in Vidarbha ) केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना जाणून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी तसेच शेती व्यवसाय भरभराटीस यावा यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ( Demands of farmers in Amravati ) केली आहे. या आंदोलनात प्रकाश साबळे, डॉ. दिलीप काळे, रघुवीर देशमुख, प्रमोद कुचे, प्रदीप बाजड, दिलीप निंभोरकर, किरण सावंत यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.
हेही वाचा-farmers suicides : भाजपच्या सत्ता काळात सुमारे 15 हजार शेतकऱ्यांनी जीवन संपवले