अमरावती - गेल्यावर्षी झालेल्या अती पावसामूळे तालूक्यातील शेतकऱ्यांचे मुग, उडीद, सोयाबीन हे पीक पूर्णतः नष्ट झाले. नुकसानसग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. पण, पंचनामे चुकीचे झाल्याने संबंधितांवर पुन्हा पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
अंजनगाव सूर्जी तालूक्यातील गावांडगाव हिंगणी या भागात जवळपास 90 टक्के मुग व उडदाची शेती केली जाते. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेले पीक खराब झाले होते. खराब झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी २६ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी अंजनगांवच्या तहसीलदारांकडे केली होती. तेव्हा तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामेही केले. परंतु, पंचनामे करताना सातेगाव व भंडारज महसूल मंडळाचे पंचनामे एकत्र करुन पिकतक्ता अहवाल केला. त्यावेळी ज्याठिकाणी मुग उत्पन्न होत नाही तेथे मुग दाखविण्यात आली आणि ज्या भागात मुगाचे उत्पन्न होते त्याठिकाणची शेती चांगल्या स्थितीत आहे असा अहवाल तयार करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबाधितांवर कारवाई करण्यात यावी व शेताचा पुन्हा पंचनामे करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आली.
हेही वाचा - आदिवासी विद्यार्थ्यांना 'आनंददायी शिक्षणा'च्या माध्यमातून अक्षर ओळख