ETV Bharat / state

अमरावतीमध्ये कापूस नोंदणीसाठी पहाटेपासून शेतकऱ्यांच्या रांगा - शेतकरी न्युज अमरावती

खरीप हंगामाच्या पेरणीला बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरी लाखो क्विंटल कापूस खरेदीविना पडून आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा करून पुन्हा कापूस खरेदीचे निर्देश दिले.

amravati latest news  cotton registration amravati  farmer problems amravati  अमरावती लेटेस्ट न्युज  शेतकरी न्युज अमरावती  कापूस नोंदणी अमरावती
अमरावतीमध्ये कापूस नोंदणीसाठी पहाटेपासून शेतकऱ्यांच्या रांगा
author img

By

Published : Jun 4, 2020, 2:26 PM IST

अमरावती - कृषी उत्पन्न बाजार समितीत पणन महासंघाच्या कापूस नोंदणीला ३ जून ते ६ जून या ४ दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहाटे ५ वाजतपासून गर्दी केली आहे. मात्र, प्रत्यक्ष कापूस नोंदणीला १० वाजल्यानंतर सुरुवात होत असल्याने खेड्यापाड्यातून आलेल्या शेतकऱ्यांवर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. तसेच या गर्दीमुळे कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

अमरावतीमध्ये कापूस नोंदणीसाठी पहाटेपासून शेतकऱ्यांच्या रांगा

खरीप हंगामाच्या पेरणीला बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरी लाखो क्विंटल कापूस खरेदीविना पडून आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा करून पुन्हा कापूस खरेदीचे निर्देश दिले. परन्तु, जिल्ह्यात आजही हजारो शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक आहे. नोंदणीसाठी केवळ चार दिवसांचा अवधी असल्याने हजारो शेतकऱ्यांचा कापूस नोंदणी होणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपला कापूस लवकर नोंदणी व्हावा, या आशेने सकाळी पाच वाजता उपाशीपोटी शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.