ETV Bharat / state

'हातातोंडाशी आलेला घास हिरावला, सांगा आम्ही जगायचे कसे?'

गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबिन आणि कपाशी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आम्ही पुन्हा कर्जबाजारी व्हायचे का? सांगा आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

'हातातोंडाशी आलेला घास हिरावला, सांगा आम्ही जगायचे कसे?'
author img

By

Published : Nov 4, 2019, 1:59 PM IST

Updated : Nov 4, 2019, 7:18 PM IST

अमरावती - गेल्या १५ दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, संत्रा, मूग, उडीद आदी पिके जमीनदोस्त झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, आता प्रत्यक्ष नुकसान भरपाई कधी मिळणार? हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

'हातातोंडाशी आलेला घास हिरावला, सांगा आम्ही जगायचे कसे?'

जिल्ह्यातील शिरजगावातील शेतकरी जयंतराव बेलसरे यांनी सोयाबीनची काढणी केली होती. त्यानंतर शेतामध्ये गंजी लावण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाची अवकृपा झाली. त्यामुळे संपूर्ण सोयाबीनचे नुकसान झाले. त्यांनी आशेपोटी मळणी यंत्रातून सोयाबीन काढायला सुरुवात केली. मात्र, कधीकाळी पिवळे दिसणारे सोयाबीन पावसामुळे काळे झालेले दिसले. संपूर्ण ३ एकरावरील पिकाचे नुकसान झाल्याने आता कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

एकट्या जयंतरावांची ही परिस्थिती नाही, तर ओल्या दुष्काळात सापडलेल्या प्रत्येक बळीराजाची ही दयनीय अवस्था आहे. शासनाने हमी भावाच्या घोषणा दिल्या. मात्र, शासकीय खरेदीचा मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे खार-तळेगावच्या कृष्णाराव रोकडे या शेतकऱ्याने बाजारसमितीमध्ये सोयाबिन विकायला आणले. मात्र, कुठलाही व्यापारी त्यांचे सोयाबीन खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

केवळ सोयाबीनच नाहीतर कापसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातील कापूस निघायला सुरुवात झाली. मात्र, सतत परतीचा पाऊस बरसला. त्यामुळे कपाशीचे देखील नुकसान झाले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन नुकसानीची पाहणी करीत आहेत. पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. तसेच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देखील देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खरच मिळणार आहे का? हाच प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

Intro:ग्राउंड रिपोर्ट-स्पेशल पॅकेज स्टोरी करावी

पिकांचे झालेले अथोनाथ नुकसान पाहून जेव्हा जगाच्या पोशिंद्याच्या डोळ्यात आसवांचे ढग दाटून येतात.
-----------------------------------------------
अमरावती अंकर

गेले पंधरा दिवस मुक्कामाल असलेल्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांच अथोनाथ नुकसान केलं.सोयाबीन, कपाशी,संत्रा,मूग,उडीद आदी पीक जमीनदोस्त झाली. या काळ्या आईच्या उदरात वाढणाऱ्या पिकाच्या पैशावर रंगवलेली स्वप्ने पाण्याने वाहून नेली दोन पैसे मिळतील या हेतूने रात्र अन् दिवस घाम गाळणारा जगाचा पोशिंदा आज ढसाढसा रडतोय.शेतकऱ्यांच दुःख पाहून मन सुन्न करणारा हा स्पेशल रिपोर्ट...

Vo-1
दाण्याला कोंब फुटलेली ही सोयाबीनची गंजी.शेतात सुरू असलेले हे मळणी यंत्र आणि या मळणी यंत्रातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक सोयाबीनच्या दाण्याला निखरुन स्पर्श करणारे हे आहेत अमरावतीच्या शिरजगावातील शेतकरी जयंतराव बेलसरे. मुसळधार आलेल्या पावसाने हाता तोंडाशी आलेलं तीन एकर वरील सोयाबीन खराब केलं..आणि त्याच पावसाने या शेतकऱ्याचे डोळे आसवांच्या ढगाने भरून आनले.मळणी यंत्रातून निघानारे सोयाबीन पाहताना या शेतकऱ्यांला अश्रू अनावर होतात.अश्रूंना वाट मोकळी करून दिल्या शिवाय पर्याय नाही.कधी काळी पिवळे धम निघणाऱ्या सोयाबीनची आता ढेप झाली.येणाऱ्या पिकांतून लोकांचं कर्ज फेडू म्हणणाऱ्या जयंतरावावर पुन्हा कर्जबाजरी होण्याची वेळ आली.

बाईट-1-जयंत बेलसरे-शेतकरी शिरजगाव(अमरावती)

Vo-2

ही परिस्थिती एकट्या जयंतराव यांची नाही तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था आहे.शासनाने हमी भावाच्या घोषणा दिल्या खऱ्या पण वास्तवात मात्र शासकीय खरेदीचा मुहूर्तच सापडला नाही.त्यामुळे खार तळेगावच्या कृष्णराव रोकडे या शेतकऱ्यांने आपलं सोयाबीन अमरावतीच्या बाजार समितीत आणलं खर पण तिथं मात्र त्यांचं सोयाबीन खरेदी करायला कुणी व्यापारी येत नाही.एखादा व्यापारी आला तर नशीब म्हणाव, पण तोही या शेतकऱ्याच्या सोयाबीनला बेभाव मागून त्याच्या मेहनतीची थट्टा केल्या शिवाय राहत नाही.

बाईट-2 -कृष्णराव रोकडे .शेतकरी खार तळेगाव

Vo-3
ही झाली सोयाबीनची वाईट अवस्था आधीच सोयाबीन पाण्याने खराब, झालं वरून भाव नाही.लोकांचं कर्ज फेळाव अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.पांढऱ सोन म्हणून ज्याची ओळख आहे.त्या कापसाच्या झाडाला तर मात्र पावसाने आपल्या कवेत घेतलं नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला पांढऱ्या सोन्याने बहरणारे कपाशीचे झाड आता अतिपावसामुळे जमिनीवर लोटांगण घेत आहे..

बाईट-3-साहेबराव फिटिंग शेतकरी.

पाऊस आला पंधरा दिवसाच्या मुक्कामा नंतर शेतकऱ्यांना उध्वस्त करून निघून गेला.मग मुख्यमंत्र्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले.रीतिरिवाज प्रमाने कार्यालयातच बसूनच अधिकाऱ्यांचे पंचनामा करण्याचे लोकशाहीतील सोहळे सुरू झाले.सत्तास्थापन करण्यासाठी भांडणारे आता शेवटच्या टप्यात शेताच्या बांध्यावर जाऊ लागले.आदेश, पंचनामे, भरघोस नुकसान भरपाई,कोटींची तरतूद नेहमी प्रमाणे हेच शब्द एकूण मात्र शेतकऱ्यांला आशा घेऊन जगावं लागत. पिकवतोय म्हणून आपण खातोय.कारण जगाचा पोशिंदा तो आहे...

स्वप्निल उमप
Etv भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Nov 4, 2019, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.