ETV Bharat / state

पिकलं तरच चुल पेटते, त्यात दुबार पेरणीचं संकट.. बोगस बियाणाने शेतकरी हतबल

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अडगाव हे शे-पाचशे उंबरठ्याच गाव. येथील मुख्य व्यवसाय शेती. या गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही. याबातच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत.

farmer-second-time-sowing-due-to-bogus-seeds-in-amravti
बोगस बियाणाने शेतकरी हतबल
author img

By

Published : Jun 27, 2020, 1:08 PM IST

अमरावती - घरची परिस्थिती अतिशय हलाकीची, शेतात चांगले पीकं आले खरे, मात्र, योग्य भाव मिळाला तरच घरची चुल पेटते.. अशी परिस्थिती. चार पोटची मुले त्यातील तीन जण संसारात गुंतले. त्यामुळे आता एक मुलगा आणि एकटीच ८० वर्षाची वृध्द महिला शेती करते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शेतात पेरणी केली. मात्र, पेरलेले उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

बोगस बियाणाने शेतकरी हतबल..

बाजारपेठ नसल्याने ४ क्विंटल कापूस घरात पडून आहे. शेत पेरायला उसनवारी करुन पैसे आणले. कोरडवाहू शेतात यंदा सोयाबिनची पेरणी केली. मात्र, परलेले उगवलेच नाही. त्यामुळे अमरावतीच्या अडगाव येथे राहणाऱ्या वृध्द शेतकरी महिलेवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. प्रमिला मोहोड असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला बियानाने दगा दिल्याने प्रलिमा खचल्या आहेत.

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अडगाव हे शे-पाचशे उंबरठ्याच गाव. येथील मुख्य व्यवसाय शेती. या गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. प्रमिला यांच्याकडे एक एकर शेती आहे. प्रमिला यांना चार मुले आहे. त्यातील तिघे विवाहित आहेत. तिघेही आपल्या संसारात गुंतले आहे. प्रमिला यांना एकमेव आधार असलेला पती मोलमजुरीसाठी बाहेर गावी राहतो.

यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाल्याने प्रमिला यांनी उसनावरी करून २२०० रुपये किंमतीचे एका नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. पेरणीसाठी ५ हजारांचा खर्च झाला. मात्र, परलेले बियाणे पुर्णत: उगवलेच नाही. प्रमिला यांच्या प्रमाणे त्यांच्या गावातील इतरही शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे बियाणे बोगस असल्याचे समजले. येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. प्रमिला यांनी परत उसनवारी करुन दुबार पेरणी केली आहे.

प्रमिला पायाने दिव्यांग आहेत. त्यांना पायाने चालण्यासाठी त्रास होतो. अशा परिस्थितही प्रमिला शेतीत मेहनत करत आहेत. शासनाच्या कुठल्याच योजनेचा लाभ प्रमिला यांना मिळाला नाही. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेसाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचाही काही फायदा झाला नाही. किमान निराधार योजनेचा तरी फायदा मिळावा, अशी मागणी प्रमिला यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.