ETV Bharat / state

सोयाबीन, कपाशीनंतर आता तूरही जाणार? अमरावतीमध्ये बळीराजा संकटात

जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी नंतर तूर हे प्रमुख खरीप पिके आहेत. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही या प्रमुख पिकांवर अवलंबून आहे. जिल्ह्यात 110012 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यातच यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनची धूळधाण केली. त्याचा कापसाच्या पिकालाही जोरदा फटका बसला.

Farmer crisis in amravati district maharashtra
सोयाबीन, कापूस नंतर आता तूरही जाणार?
author img

By

Published : Dec 2, 2019, 8:00 AM IST

अमरावती - मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह आदी पिकांनी निराशा केली, तर आता जोमदार बहरलेल्या तुरीवर ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा महागड्या फवारणी कराव्या लागणार आहेत. आधीच डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना आणखी पुन्हा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

सोयाबीन, कापूस नंतर आता तूरही जाणार?

जिल्ह्यात सोयाबीन, कपाशीनंतर तूर हे प्रमुख खरीप पिके आहेत. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही या प्रमुख पिकांवर अवलंबून आहे. जिल्ह्यात 110012 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यातच यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनची धूळधाण केली. त्याचा कापसाच्या पिकालाही जोरदा फटका बसला. त्यामुळे कपाशीचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. तसेच सोयाबीनला मातीमोल दर मिळाले.

हेही वाचा - राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढू- छगन भुजबळ

दरम्यान, या 2 पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या पिकाची आशा होती. मात्र, सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवर मोठ्या प्रमाणावर अळ्याचा प्रादुर्भाव पडला आहे. यामुळे तुरीचे पीक हातातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना आता वाटू लागली आहे.

हेही वाचा - जनतेच्या विकासासाठी महात्मा फुलेंचा आसूड मंत्र्यांवर ओढा - बच्चू कडू

Intro:ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत,बहरलेल्या तुरीवर आता अळ्याचा प्रादुर्भाव.
-------------------------------------------------------
अमरावती अँकर 

मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी सह आदीदी पिकांनी निराशा केल्यानंतर जोमदार बहरलेल्या तुरीवर आता ढगाळ वातावरनामुळे  अळ्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना आता पुन्हा महागड्या फवारणी कराव्या लागणार आहे.त्यामुळे डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना आणखी पुन्हा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे..

 अमरावती जिल्ह्यात सोयाबीन ,कपाशी नंतर तूर हे प्रमुख खरीप पिके आहे.शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाही या प्रमुख पिकांवर अवलंबून आहे .जिल्ह्यात सोयाबीन कपाशी नंतर सर्वाधिक तुरीचे हे पीक आहे. जिल्ह्यात एक लाख दहा हजार बारा हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यातच यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनची धूळधाण केली.त्याचा कपाशीलाही जबर फटका बसला असतानाच  कपाशीचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. सोयाबीनला तर मातीमोल दर मिळाले दरम्यान दोन पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना  तुरीच्या पीकावर आशा होती. परंतु सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवर मोठ्या प्रमाणावर अळ्याचा प्रादुर्भाव पडला आहे. त्यामुळे तुरीचे पीक हातातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना आता वाटू लागली.तूर पिकाच्या बचावासाठी शेतकऱ्यांना आता महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे...Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.