अमरावती - चांदूर रेल्वे शहरात आगळीवेगळी होळी साजरी केली गेली. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे, कामगार विरोधी कायदे तसेच खासगीकरणाच्या विरोधात रविवारी सायंकाळी होळी साजरी करण्यात आली. गाडगेबाबा मार्केटमध्ये सीसीएन कार्यालयाजवळ कृषी कायद्यांच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय किसान संघाचे समन्वय समितीचे विजयराव रोडगे (भाकपा), देविदास राऊत (किसान सभा), विनोद जोशी (भाकपा), नितीन गवळी (आम आदमी पार्टी), मेहमुद हुसेन, प्रा. प्रसेनजित तेलंग (प्रगतशिल लेखक संघ), विनोद लहाने, चरण जोल्हे, हरिभाऊ चव्हाण, रामदास कारमोरे (माकपा), कृष्णकांत पाटील, निळकंठ दिगडे, शैलेश डाफ, निलेश कापसे, प्रभाकर कडू, गोपाल मुरायते, पंकज गुडधे, भीमराव बेराड, अशोक गारोडे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - बुरा न मानो होली है..!कोरोनाच्या संकटावर पोलिसाने दिला वैदर्भीय कवितांचा तडका